भारतीय संघाने न्यूझीलंड वर विजय मिळवत. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये सलग पाचवा विजय साजरा केला. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडवर विजय मिळवला. आता टीम इंडिया विजयी सिक्स मारण्यासाठी तयार आहे. टीम इंडियाचा पुढील सामना हा २९-ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध लखनऊमध्ये होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया लखनऊमध्ये पोहचली आहे. मात्र त्याआधी भारतीय संघाच्या साठी एक निराशाजनक बातमी पुढे आली आहे.
भारतीय संघाचा अष्टपैलू उपकर्णधार हार्दिक पंड्या याच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. सूत्रांनी बीसीसीआयला दिलेल्या माहितीनुसार हार्दिक पंड्या याला दुखापतीमुळे इंग्लंड आणि श्रीलंका विरुद्धच्या सामन्यात खेळता येणार नसल्याचं समजतंय. हार्दिकला आधीच न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्याला मुकावं लागलं होतं. त्यात आता पुढील 2 सामन्यात खेळणार नसल्याची चर्चा असल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय. हार्दिकला पुण्यात बांगलादेश विरुद्ध झालेल्या सामन्यात आपल्याच गोलंदाजी दरम्यान दुखापत झाली होती.एक फलंदाज व गोलंदाजांची कमतरता हार्दिक मुळे भारतीय संघाला जाणवणार हे नक्की