मराठा समाजाला आरक्षण न देण्याचा सरकारचा डाव म्हणजे मराठा समाजा विरुद्ध सरकारचे षड्यंत्र असल्याचा आरोप मनोज पाटील जरांगे यांनी केला.आता आपला सरकारने नेमलेल्या समितीवर आपला विश्वास नसल्याचे मनोज पाटलांनी म्हटले आहे.मराठवाडा विभागात हजारो कुणबी पुरावे हाती लागले असताना आरक्षण देण्यात अडचण काय असे मनोज पाटील म्हणाले.आता मराठा आरक्षणाचा मुद्दा विशेष अधिवेशन घेऊन मार्गी लावावा असेही ते म्हणाले.मनोज पाटील यांची प्रकृती ढासळली असून त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला.
मराठा आंदोलक ठिकठिकाणी आता आक्रमक पवित्रा घेत असून बिड येथील शासन आपल्या दारी हा कार्यक्रम मराठा समाज बांधवांनी घोषणा देत उधळून लावला.नांदेड चे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकरं याच्या ताफ्यातील दोन गाड्या आंदोलकांनी फोडल्या.नगर मध्ये आमदार मोनिका रांजळे यांचाही ताफा अडवला.
