हिंदू धर्मात काशी तिर्थस्थानास अनन्य साधारण महत्व आहे.तसेच महाराष्ट्रातील नव्हे देशातील वारकरी व कस्टकरी शेतकरी शेतमजुरांचे तीर्थक्षेत्र म्हणजे पंढरपूर दर वर्षी आषाढी एकादशीला येथे भाविक भक्तांचा वैष्णवांचा महा मेळावा भरतो.तसा आता मराठासमाजासाठी काशी व पंढरपूर म्हणजेच जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी ठरत आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मनोज पाटील जरांगे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. या दरम्यान उपोधन मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी ग्रामस्थ महिला अबाल वृद्धावर लाठीहल्ला केला होता. त्यामुळे आंदोलनाचा धुरळा संपूर्ण राज्यात उडाला.मनोज पाटील यांची समजूत घालण्यासाठी मुख्यमंत्री अंतरवली सराटी येथे असले होते व सतरा दिवसांनी त्यानी आश्वासन देऊन मनोज पाटील यांचे उपोषण सोडवले होते.सरकारने एक महिन्याच्या कालावधी माघीतला होता. मनोज पाटील जरांगे यांनी सरकारला ४० दिवसाचा कालावधी दिला होता.मात्र सरकारला आरक्षण देण्यात यश आले नाही म्हणून मनोज पाटलांनी पुन्हा उपोषण सुरू केले.एक निस्वार्थ नेता मिळाल्याने मराठा समाज एकवटला न भूतो न भविष्यती अशी कोटी मराठा समाज बांधवांची विराट सभा अंतरवली सराटी ला पार पडली.
आज मनोज पाटलांना समर्थन देण्यासाठी राज्यभर साखळी उपोषण सुरू आहे.ठिकठिकाणी नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे.नेत्यांच्या गाड्या अडवून प्रवेश बंदी पुतळा दहन असे प्रकार सुरू झाले आहे.मनोज पाटलांना भेटण्यासाठी व पाहायला दररोज हजारो समज बांधव अंतरवली सराटी यर्थे येत आहेत. आपल्या समाजाच्या संघर्ष योद्याला मिळणारे समर्थन म्हणजेच पंढरीच्या पांडुरंगाला भाविकांचे मिळणारे श्रद्धा पूर्वक प्रेमच म्हणावे लागले.एकंदरीत आंतरवली सराटी म्हणजे एक तीर्थक्षेत्र झाले आहे.
प्रमोद कुदळे
9422396999
