माहूर/किनवटसह हिंगोली लोकसभा मतदारसंघात सुमठाणकरांचा झंझावात
लोकसभा निवडणुक लढविण्यासाठी “एकदम तय्यार: सुमठाणकर
माहूर तालुका प्रतिनिधी बजरंगसिंह हजारी
“आया मौसम लोकसभा-२०२४ चुनावों का! अर्थात या आगामी निवडणुकीची निवडणूक आयोग केव्हाही घोषणा करु शकते.या पार्श्वभूमीवर हिंगोली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लपविण्यासाठी इच्छुक कामाला लागले असून,त्यापैकी काहींनी चक्क गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी चालवली आहे.तसे पाहता हिंगोली लोकसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात मिळविण्यासाठी सर्वच राजकीय त्यामुळे २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरण्याची अनेकांकडून तयारी सुरु झाली आहे.त्यात सध्या भाजपा हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी जोरदार मुसंडी मारत माहूर/किनवट विधानसभा मतदारसंघासह संपूर्ण हिंगोली मतदारसंघ पिंजून काढत भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशात राबविण्यात आलेल्या १० वर्षाच्या सत्ता काळातील विविध विकासाच्या जनकल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी बनविलेल्या चित्ररथाचा लोकार्पणानिमित्त त्यांनी माहूर तालुक्यातील जनताजनार्दनांशी संवाद साधला असता त्यांनी आगामी हिंगोली लोकसभा लढवावी म्हणून लोकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
आगामी लोकसभा निवडणुकीत नशीब आजमाविण्यासाठी विविध पक्षाच्या अनेक इच्छूक नेत्यांनी मतदार संघात पक्ष संघटना बांधणी,सदस्य नोंदणी,कार्यकर्ते व पदाधिकारी जोडणे,सर्वसामान्य नागरिकांच्या भेटीगाठी,विविध समस्या निराकरण,या पायाभूत मजबूतीकरणावर भर दिला जात आहे.
याच अंतर्गत दिड दशकाहून अधिक काळ सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत भारतीय जनता पक्षाच्या विचारांचा वारसा लाभलेले,महाविद्यालयीन शिक्षण, व स्वतः पूर्णपणे समाजाच्या उद्धारासाठी समर्पित केलेले व हे करत असताना सर्वसामान्य लोकांचे प्रश्न जवळून पाहिलेले कार्यसम्राट तथा आपल्या अधिकारी पदाच्या कार्यकाळात जनसामान्यांच्या हृदयावर छाप पाडलेले माजी मुख्याधिकारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघातील किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात भेटीगाठी वाढविल्या असून नुकताच माहूर किनवट तालुक्याचा दौरा करून भारतीय जनता पक्षाकडून देशभरात झालेल्या विविध विकास कामासह जनकल्याणकारी योजनांच्या माहितीचा चित्ररथ बनविला असून या चित्र रथाच्या लोकार्पण प्रसंगी त्यांनी माहूर शहरासह तालुक्यात भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
२००६ ते २००९ लातूर पोस्ट ऑफिसला सहाय्यक,२००९ ला मुख्याधिकारी म्हणून निवड,२०१० ते २०१२ सहायक आयुक्त अकोला तर २०१२ ते २०१४ या कालावधीत किनवट नगरपालिकेचे मुख्याधिकारी,तेथेच अतिक्रमण निर्मूलन कार्यवाही करुन रस्ता मोकळा केल्यामुळे तेथील नागरिकांनी त्यांची तेथून बदली झाल्यानंतर उत्स्फूर्तपणे त्या रस्त्याला “रामदास पाटील” मार्ग नाव दिले.तदनंतर हिंगोली येथे पालिकेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असताना प्रशासकीय व सामाजिक कार्यात आपला आगळावेगळा ठसा उमटविणाऱ्या रामदास पाटील सुमठाणकर यांनी जवळपास दोन वर्षांपूर्वी प्रशासकीय सेवेतून स्वेच्छा सेवानिवृत्ती घेऊन सक्रिय राजकारणात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला.त्यासाठी त्यांनी भाजप हा पक्ष निवडून पक्षात रितसर प्रवेश करुन आपली राजकीय इनिंग सुरु केली.त्यानंतर त्यांनी हिंगोली लोकसभा मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघात बैठका घेऊन पक्षाच्या कामाला सुरुवात केली आहे.दरम्यान त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची भाजपा दिव्यांग प्रकोष्ठचे प्रदेश प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.दरम्यान भाजपाकडून आखण्यात आलेल्या “लोकसभा प्रवास योजना ” अंतर्गत हिंगोली लोकसभा प्रभारी पदी पक्षाने नियुक्ती केली आहे.
रामदास पाटील यांचा बुथ कार्यकर्ता पर्यंतचा निरंतर प्रवास, प्रशासकीय अनुभव,संघटन कौशल्य,युवायुवा चेहरा यातून पक्षाचा अभ्यासू कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख निर्माण होत आहे.
दरम्यान,भारतीय जनता पार्टी च्या सरकारच्या लोकोपयोगी कामांच्या आणि योजनांचे माहितीचा चित्ररथ प्रत्येक गावातील गल्लीबोळात फिरवून नागरिकांनी या योजनांचा लाभ कसा घ्यावा याची माहिती चित्ररथासह कार्यकर्ते घरोघरी जाऊन देत असल्याने रामदास पाटील सुमठाणकर यांनी सुरू केलेला आगळावेगळा प्रचार सध्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.लोकसभा निवडणुकीसाठी एक नवीन तडफदार व जमिनीशी नाळ जुळलेला कार्यकर्ता हिंगोली लोकसभा मतदारसंघातून भाजपाचा संभावित उमेदवार म्हणून रामदास पाटील सुमठाणकर यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या तरी माहूर किनवट तालुक्यातील नागरिकांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे.
हिंगोली लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी तयार: सुमठाणकर
भारतीय जनता पक्षाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी सरकारचे कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम पक्षश्रेष्ठीच्या आदेशाने करत असून,पक्ष श्रेष्ठींनी आदेश दिल्यास आगामी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी “एकदम तय्यार” असल्याचे रामदास पाटील सुमठाणकर यांनी सांगितले आहे.