“मन की बात” कार्यक्रमाचा सेल्फी फोटो काढून पाठवावा!
:- घोडेकर
माहूर तालुका प्रतिनिधी: बजरंगसिंह हजारी
पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या “मन की बात” याकार्यक्रमाचा १०६वा भाग रविवार,दि.२९ ऑक्टोबर रोजी प्रसारित करण्यात येणार असल्याने भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी,शक्ती केंद्र प्रमुख,बुथ प्रमुख,कार्यकर्ते या सर्वांनी सदरील एपिसोड पाहताना किंवा रेडीओ वर ऐकताना ग्रुप फोटो,सेल्फी फोटो काढून पाठवावे! असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे माहूर तालुका अध्यक्ष कांतराव घोडेकर यांनी केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या बहुचर्चित कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्ते पंतप्रधान मोदी यांचे दुरदृष्टितापूर्ण बहुमूल्य विचार ऐकून समाधानी होतात व त्यामुळे पक्षाचे संघटनात्मक काम अधिक जोमाने करण्याची चालना मिळते असे मत भाजपा ता.अ.घोडेकर यांनी व्यक्त केले असून,काढलेले सेल्फी फोटो आपापल्या सरल ऍप वर अपलोड केल्याने पक्षाचे काम महानगर,शहर ते गाव खेड्यात अत्यंत तळमळीने सुरू असल्याची केंद्रीय स्तरावर आपल्या नावावर नोंद होणार आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे पक्ष संघटन अधिक मजबूत होणार असल्याचे घोडेकर यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हटले आहे.