बहुचर्चित विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबाद गुजरात च्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवल्या गेला यात सलग १० सामने जिंकणारा व विजयाचा प्रमुख दावेदार मानला जाणारा भारतीय संघ पराभूत झाला,.जय पराजय हा खेळाचा भाग आहे आणि बहुतेक वेळा या खेळाला नशिबाची देखील साथ हवी असते त्या दिवशी सर्वच बाबी भारतीय संघाच्या विरुद्ध गेल्या सुरुवातीलाच नाणेफेक हरल्याने अपशकुन झाला…
मात्र पराभव झाल्यावर समाज माध्यमातून देशाचे पंतप्रधान व गृहमंत्री यांना नेटकर्यांनी पनौती म्हणत ट्रोल केले.
हे कमी की काय एका प्रचार सभेत काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख पनौती मोदी असा केला त्यामुळे राजकारण चांगलेच तापले.वास्तविक खेळास राजकारणाशी जोडणे किंवा जोडून टीका करणे चुकीचे आहे
धर्म आणि खेळ यापासून राजकारण दूर असले पाहिजे पण आता आमच्या देशात राजकारणाला धर्माचा,चित्रपट सृष्टीचा खेळाचाआधार घ्यावा लागतो हे दुर्दैव आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बी. सी. सी. आय .ही स्वायत्त संस्था जगात सर्वात श्रीमंत म्हणून ओळखल्या जाते
त्याचे नाममात्र अध्यक्ष आहेत क्रिकेट पटू रॉजर बिन्नी व सर्वेसर्वा आहेत गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा ते असण्या बद्दल कोणत्याही भारतीयांचे दुमत असण्याचे कारण नाही.पण अंतिम सामन्यासाठी जी निमंत्रणे दिल्या गेली त्यात पत्रकार खेळाडू अभिनेते यांचा समावेश होता. ही चांगलीच बाब आहे पण एक क्रिकेट चा चाहता म्हणून एक गोस्ट मात्र मनाला खटकली.
ज्या कपिल देव च्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीयांनी १९८३ चा विश्वचषक जिंकला त्या कपिल पाजी ला निमंत्रण दिले गेले नाही का…?बहुतेक त्या वर्षी देशाच्या पंतप्रधान काँग्रेस च्या इंदिरा गांधी होत्या म्हणून…?
दुसरा विश्वचषक २०११ विजेता कॅप्टन कुल व बेस्ट फिनिशर समजल्या जाणाऱ्या व कर्णधार म्हणून ज्याने प्रदीर्घ काळ भारताचे नेतृत्व केले तो माही म्हणजे एम एस धोनी। त्या महेंद्रसिंग ला देखील आमंत्रित केले गेले नाही का..?
२०११ ला देशाचे पंतप्रधान काँग्रेस चे मनमोहन सिंग होते म्हणून..?
बीसीसी आय चा माजी अध्यक्ष राहिलेला ज्याच्या नेतृत्वाखाली विदेशात भारताला जिंकण्याची सवय लागलीतो दादा महाराजा
सौरभ गांगुली याला सुद्धा बोलवले नाही का..?
त्याला भाजप पक्षात येण्याचे निमंत्रण दिल्यावर सुद्धा तो आला नाही उलट त्याने ममता बनर्जी यांच्य पक्षाशी जवळीक केली म्हणून….?
असो काहीहीअसले खेळा वरून कोणीही कोणावर टीका करू नये पंतप्रधान हे देशाच्या सन्मानाचे पद आहे त्याचा सर्च भारतीयांना आदर आहेच पण त्या तीन महान व धुरंधर खेळाडूंना अंतिम सामन्यासाठी का आमंत्रित केले नाही हा प्रश्न विचारण्याचा अधिकार मात्र सर्वच भारतियांना आहे नाही का…?
प्रमोद कुदळे
(संपादक बोल महाराष्ट्र )
