उत्तर काशीत बोगद्यात अडकलेल्या मजुरांचे प्राण वाचवण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असून हे मिशन अंतिम टप्प्यात पोहव्हले आहे आज कोणत्याही क्षणी चांगली बातमी येण्याची शक्यता आहे.
४२ मजुरांना वाचवण्यासाठी सुरू असलेल्या या बचाव मोहिमेतील बुधवारचा २२ नोव्हेंबर दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो.
६७ टक्के ड्रिलिंग पूर्ण झाल्यचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. बोगद्यातील ढिगाऱ्यातून ४२ मीटरपर्यंत आडवे पाईप टाकण्यात आले आहेत.
अन्न पुरवण्यासाठीची दुसरी लाईफलाइन व्यवस्थितपणे काम करत आहे. रोटी, भाजी, खिचडी, दलिया, संत्री, केळी याबरोबरच औषधी आणि इतर महत्त्वाचं साहित्यही त्यातून पाठवलं जात आहे. त्यात टी शर्ट, अंडर गारमेंट, टूथ पेस्ट, साबण यांचा समावेश आहे.
वरून केल्या जाणाऱ्या ड्रिलिंगसाठी त्यांनी ठरलेल्या ठिकाणी मशीन लावले आहेत.
अधिकाऱ्यांना बारकोटच्या बाजुनंही (बोगद्याची दुसरी बाजू) मजुरांना वाचवण्यासाठी कामाची सुरुवात केली आहे. त्यासाठी यापूर्वीच चार स्फोटही करण्यात आले आहेत. त्यामुळं जवळपास ९.१० मीटरचा भाग मोकळा झाला आहे. रोज अशा प्रकारचे तीन स्फोट करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
