महाराष्ट्र सरकार च्या दिव्यांग कल्याण विभागाकडून दिव्यांगासाठी व्यवसाय करण्यासाठी पर्यावरण पूरक ई रिक्षा देण्यात येणार आहेत तसा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाला होता म्हणून वाहन मिळवण्यासाठी ऑन लाईन अर्ज मागवले होते.परंतु दिलेल्या वेळेत व मर्यादेत अनेक दिव्यांगाणीअर्ज भरण्यास तारीख वाढून मिळावी अशी विनंती आमदार व दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या कडे केली होती ही मागणी लक्षात घेऊन आमदार बच्चू कडू यांनी मुदतवाढ देण्यात यावा म्हणून सचिव दिव्यांग कल्याण मंत्रालय यांना पत्र देण्यात आले होते. या पत्राची तातडीने दखल घेत
सरकारने अर्ज सादर करायला ८ जानेवारी सायंकाळी ५ वाजता पर्यंत मुदतवाढ दिली आहे त्यामुळे
दिव्यांग वर्गातून बच्चू कडू याचे आभार मानण्यात येत आहे.
