माहूर तालुक्यात सायफळ ढगलाई घाट पैनगंगा नदीपात्रातून रात्री अवैध रेती सर्रास चोरी सुरू..
*प्रशासनाचे जाणून बुजून दुर्लक्ष;*
*गावकऱ्यांच्या तक्रारीला दाखवितात केराची टोपली*
माहूर/ ता.प्रतिनिधी/अमजद खान
माहूर तालुक्यात सायफळच्या ढगलाई रेती घाट पैनगंगा नदीपात्रातून रात्रीच्या सुमारास अवैध रेतीचे उत्खनन जोमात सुरू आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. याकडे महसूल प्रशासनचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने
माहूर तालुक्यातील सायफळ रेती घाटावर रेती तस्करांना रोखण्यासाठी माहूर महसूल विभाग व ग्राम दक्षता समितीने दिनांक २८ डिसेंबर रोजी सायफळ रेती घाटावर एक मोठी खंदक तयार केली होती, ज्यामुळे रेती तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली होती
परंतु रेती तस्करांनी दोन ते तीन दिवसात रात्रीला जाऊन ती खंदक जेसीबीच्या साह्याने बुजून त्या ठिकाणी रस्ता तयार करून रेती तस्करी सुरू केली आहे, ज्यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे,
रेती माफियांनी ११,१२ च्या सुमारास खुलेआम पणे गोकुळ गोंडेगाव, मदनापुर, वाई बाजार या परिसरात वाहतूक केली जात आहे. सायफळ ढगलाई या रेती घाटातून खुलेआम मोठ्या प्रमाणात उपसा करून रात्रीच्या सुमारास वाहतूक सुरू आहे.
ढगलाई रेती घाट नदीपात्रात मोठे मोठे खड्डे निर्माण झाले आहेत.या पैनगंगा नदीमध्ये पाच ते २५, फूट खोल रेती साठा आहे, परंतु महसूल खात्याचे काही अधिकारी मलिदा गोळा करण्यात व्यस्त असल्याने नदीपात्रातून ही अवैध रेती उत्खननाला पेव फुटले आहे. मोठ्या प्रमाणात रात्रच्या सुमारास रेतीची तस्करी वाढली असून खुल्या अवैध रेती वाहतूक केली जात आहे. यामुळे शासनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे रात्रीच्या वेळी अवैध रेतीची तस्करी करण्याकरिता रेती रेती माफियांनी वेगवेगळी शक्कल लढवीत आहेत. या प्रकाराला वेळीच आळा घालण्यासाठी वरिष्ठांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे. रात्रीची रेती चोरी रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. महसूल विभागाने रेती तस्करावर आळा घालण्यासाठी गत काही महिन्यापूर्वी रेती माफियावर पाळत ठेवून वाहनधारकावर कारवाई केली होती. परंतु त्यानंतर अवैध रेती वाहतुकीकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा अवैधरित्या रेतीचे उत्खनन जोमात सुरू आहे.