विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्ती चा लाभ घेऊन देशाचे समाजाचे नाव मोठे करावे व देश व समाजाची सेवा करावी असे प्रतिपादन यवतमाळ जिल्हा व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री व मृद जलसंधारण मंत्री ना.संजय राठोड यांनी केले.
आज स्वागत मंगल कार्यालय, नेर येथे गरजवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप तथा पदवीधर, पदविका व गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.संजय भाऊ राठोड यांच्या उपस्थित पार पडला. या सोहळ्यास मा. संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते गरजवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केला. यावेळी विद्यार्थ्यांना मा. संजय भाऊ राठोड यांनी मार्गदर्शन करत दर्जेदार शिक्षण घेऊन भविष्यात समाजासाठी चांगलं काम उभ करावं अशा शुभेच्छा दिल्या.
यावेळी तालुका प्रमुख मनोज नाल्हे, शहर प्रमुख रितेश चिरडे यांच्यासह पदाधिकारी व विद्यार्थी ब
हुसंख्येने उपस्थित होते.