(प्रतिनिधी संदीप ढाकुलकर पुणे)
शरद मोहोळ यांच्या हत्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
पुण्यामध्ये भर दिवसा शरद मोहोळ यांचा गोळ्या घालून निर्गुण खून करण्यात आला गोळ्या झाडल्यावर शरद मोहोळ यांना रुग्णालयात दाखल केले होते पण उपचाराअभावी त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेने पुणे शहर आणि कोथरूड परिसर चांगलाच हादरला आहे वृत्तानुसार शरद मोहोळ यांची पत्नी स्वाती मोहोळ यांनी नुकताच भाजपा पक्षामध्ये प्रवेश केला होता. कोथरूड परिसरामध्ये शरद मोहोळ टोळीचे चांगलेच वर्चस्व होते याचा फायदा 2024 निवडणुकीत भाजपाला होणार होता. कुख्यात गुंडाला भाजपा मध्ये घेतल्यामुळे भरपूर टीका सुद्धा झाल्या होत्या पण नेमकी शरद मोहोळ यांचा गेम कोणी केला हे पडद्यामागचे गुपित आहे माहितीनुसार शरद मोहोळ यांच्यावर खंडणी, हत्या, हत्तेचा प्रयत्न , असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. शरद मोहोळ यांनी जामीनवर आल्यावर दासवे गावचे सरपंच शंकर दिंडले यांचे अपहरण केले होते आणि याच गुन्ह्यासाठी त्यांना पुणे पोलिसांनी परत अटक केली होती असे वृत्त आहे.
