आम्ही महा युतीत आहो पण लोकसभेच्या जागावाटपाचा फार्मूला मित्र व घटक पक्षांना सांगायला हवा. भाजप जरी मोठा पक्ष असेल तर आमच्या सारख्या लहान पक्षांचेही स्वतंत्र अस्तित्व आहे त्यामुळे भजप ने आम्हाला हलक्यात घेण्याची चूक करू नये अन्यथा भजप ला ते महागात पडेल आता इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला त्यावरून महा युतीत लोकसभा जागा वाटपात घुसफूस समोर आली आहे.
मित्र पक्षांची गरज नाही, म्हणून भाजप असे वागत असेल, तर ते चुकीचे आहे. भाजप हा मोठा पक्ष आहे. महायुतीचे आम्ही छोटे घटक आहोत. पण, आमचाही विचार व्हायला हवा. आमची विचारपूस होणार नसेल, तर त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. आपण विधानसभेच्या १५ जागांची मागणी केली असून काही लोकसभा मतदार संघात निवडणूक लढण्याची प्रहार जनशक्ती पक्षाची तयारी आहे. पण, अजूनपर्यंत भाजपने आमच्यासोबत चर्चा केलेली नाही. चर्चा होणार नसेल, तर ते अडचणीचे ठरेल, असे बच्चू कडू म्हणाले.