डिजिटल शाळा ही काळाची गरज असून या माध्यमातून विद्यार्ह्यांचा शैक्षणिक विकास व प्रगत होईल.वाढत्या तंत्रज्ञान व डिजिटल युगात हे शिक्षण महत्वाचे आहे असेही नामदार संजय राठोड म्हणाले.
आज दारव्हा येथील मराठी शाळा क्रं. १ मधील डिजीटल क्लास रुम व इंटेरीयर वर्क या कामाचे उद्घाटन आज राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ व वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री .ना.संजय राठोड यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला. आणि वर्गखोलीतील डिजिटल बोर्डावर जय महाराष्ट्र, जय हिंद,वंदे मातरम अशी अक्षरे। गिरवली यातून राठोड याचा सुदंर हस्ताक्षराची चर्चा होती. डिजिटल स्वरूपात शिक्षण विद्यार्थ्यांसाठी अतिशय प्रभावी ठरत असून या क्लास रूम चा विद्यार्थ्यांना शिक्षणात अधिक फायदा होईल असा विश्वास यावेळी मा. संजय भाऊ राठोड यांनी व्यक्त केला.
