प्रतिनिधी संदीप ढाकुलकर
कार्य भूषण पुरस्काराने निलेश आचमवार सन्मानित
महा मार्गावर कुठही अपघात घडला तर पहिल्यांदा नाव आठवते ते निलेश चे आपल्या सेवाभावी वृत्तीने अनेक गरजू रुग्णांना मदत करणारा कायम दुसऱ्याच्या संकटात माघे उभे राहून धीर देणाऱ्या निलेश आचमवार याचा काही महिन्यांपूर्वी महामार्ग पोलिसांनी सत्कार केला होता.त्याच्या याच कामाची दखल घेत आर्णी सायकलिंग क्लबच्या वतीने निलेश ला सन्मानित करण्यात आले २०२३ चा कार्य भूषण हा सन्मान त्याला देण्यात आला. आर्णी सायकलिंग च्या या
आर्णीसायकलिंग क्लब द्वारे दिल्या जाणारा यावर्षीचा कार्य भूषण पुरस्कार निलेश आचमवार यांना घोषित केला आहे. महामार्गावर होणाऱ्या अपघातात निलेशने अनेक जखमी ची मदत करून जीवनदान दिली आहे. संकट काळात कोणीही हाक दिली तर निलेश तात्काळ त्या ठिकाणी हजर असतो. त्याच्या उल्लेखनीय कार्यामुळे त्याला आर्णी सायकलिंग क्लब द्वारे कार्य भूषण पुरस्कार 2024 देऊन निलेशला सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारामुळे निलेश चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
