राज्यातील ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी आज आमदार अपत्रता निकालावर बोलतांना म्हटले की ज्यांच्याकडे सत्ता असते ते लोक सत्ता सोडत नाही त्यामुळे सत्तेचा हा खेळ कसा रंगतोय हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे असे वक्तव्य निकम यांनी केले.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सप्टेंबरपासून शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी सुरू होती. २० डिसेंबर २०२३ रोजी ही सुनावणी संपली.
या प्रकरणात आतापर्यंत २ लाखांहून अधिक पुराव्यांची कागदपत्र दाखल करण्यात आली आहेत. तसंच आमदार आणि ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू, शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यालयाचे कर्मचारी विजय जोशी, शिंदे गटाचे आमदार दिलिप लांडे, आमदार योगेश कदम, मंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष आणि उलट तपासणी पूर्ण झाली.
पक्षांतर बंदी कायद्याची स्पष्टता आणि नेमकी व्याख्या या प्रकरणाच्या निकालानंतर स्पष्ट होईल.
आज लागणार निकाल हा भविष्याचा दृष्टीने दिशादर्शक असणारा असेल.
. सर्वोच्च न्यायालयाच्या या प्रकरणातील मर्यादा स्पष्ट होतील.
. अशा प्रकरणांमधील अध्यक्षांची कार्यकक्षा आणि अधिकार हे स्पष्ट होतील.