प्रतिनिधी संदीप ढाकुलकर
युवा श्री विशाल राखुंडे यांना २०२४ चा कार्य गौरव पुरस्कार जाहीर…!!
जिल्हा, राज्य ,राष्ट्रीय, पुरस्कार प्राप्त युवाश्री विशाल राखुंडे यांना २०२४ चा कार्य गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विश्वरत्न स्वामी विवेकानंद जयंती आणि स्वामी विवेकानंद ग्रुप ऑफ ऑर्गनायझेशन यांच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त विशाल राखुंडे यांना श्री राजेश टाले यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. या पुरस्कारासाठी त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे
