मणिपूर येथून राहुल गांधी यांनी मिझोरम पासून सुयू केलेल्या भारत जोडो न्याय यात्रेच्या महाराष्ट्रातील यशा साठी आर्णी -केळापूर मतदार संघाचे काँग्रेस चे युवा नेते जीतेंद्र मोघे यान8 आर्णी तालुक्यातील अनेक गावांनाभेटी देत कार्यकर्त्यां सोबत संवाद साधला.
भारत जोडो न्याय यात्रा…
एकीकडे शेतकरी आणि शेतमजूर कर्जाच्या खाईत बुडत आहेत, तर दुसरीकडे मोदी सरकार श्रीमंतांचे कर्ज माफ करत आहे. प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाची योग्य किंमत मिळावी आणि तोही भारताच्या प्रगतीचा लाभार्थी बनू शकेल या सह देशातील सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक आणि अन्य विषयात देशातील जनतेला न्यायिक हक्क मिळावा यासाठी काँग्रेसचे नेते खासदार राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात काल पासुन मनिपुर ते मुंबई असा प्रवास करत भारत जोडो न्याय यात्रा आयोजित करण्यात आली आहे.
याच यात्रेच्या पार्श्वभुमीवर आर्णी – केळापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे युवा नेते जितेंद्रभाऊ मोघे यांच्या नेतृत्वात आज आर्णी तालुक्यातील जांब येथे या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. गावातील सर्व नागरिकांच्या घरोघरी जात त्यांच्याशी संवाद साधत. गावातील अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या तर यावर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली. गावात यात्रेचे आगमन होताच गावकऱ्यांच्या वतीने हर्षोल्लासात स्वागत करण्यात आले. तर गावकऱ्यांनी यात्रेतील सहभागी मंडळींशी विविध विषयांवर चर्चा केली.
प्रसंगी या यात्रेत राजीवभाऊ विरखेडे, सुनिलभाऊ भारती, राजुभाऊ गावंडे, अजितभाऊ राठोड, विनोदभाऊ पंचभाई, गजाननभाऊ राठोड, धिरजभाऊ गांवडे, आसीफभाई शेख, गणेशभाऊ राठोड , आशिषभाऊ राठोड, विश्वनाथभाऊ जाधव, दिनेशभाऊ पवार, राजेशभाऊ चव्हान, विजयभाऊ चव्हान, प्रकाशभाऊ चव्हान, सचिन भाऊ पवार, देविदास भाऊ चव्हाण, सुरेशभाऊ आडे, दशरथ भाऊ तायडे, उत्तमभाऊ आडे, चेतन भाऊ राठोड, योगेश भाऊ आडे, भारत भाऊ आडे,अर्जुन भाऊ आडे, गणेश भाऊ भरवडे , नितेश भाऊ पवार, राजूभाऊ राठोड, चंदन भाऊ पवार आदि सहभागी झाले होते. यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.