नांदेड-लातूर जिल्ह्यातील सीमेवर असलेल्या सुप्रीसिद्ध खंडोबा यात्रा,माळेगाव यात्रा पशु व पक्षांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे.यात्रेत देशातून विविध अश्व देखील विक्रीसाठी येत असतात.महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व.विलासराव देशमुख व उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांनी या यात्रेला अनेक वेळा भेटी देत त्यांच्या घोड्यानंही यात्रेत प्रदर्शनात ठेवलेलं आहे.विदर्भ मराठवाडा या भागातील खंडोबा च्या भाविक भक्तां साठी ही यात्रा एक सांस्कृतीक पर्वणी ठरते.
या यात्रेत सद्या एका कोंबड्याची जोरदार चर्चा असून हा कोंबडा सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदु ठरला आहे.या कोंबड्याच्या किंमत एकूण तुम्ही चकित व्हाल.
रुबाबदार कोंबडा… तब्बल 20 हजार रुपये किंमत… अडीच फूट उंची,वय 8 महिने माळेगाव यात्रेत या कोंबदयास पहाण्यास लोकांची झुंबड उडाली आहे.
