मणिपूर ते मुंबई अशी ६००० किलोमीटर भारत जोडो न्याय यात्रेचा आजचा दिवस तिसरा असून त्याच पार्श्वभूमीवर आर्णी केळापूर मधेही यावा नेते जितेंद्र मोघे यांनीही जनसंपर्क यात्रा सुरू केली असून गावागावात त्यास उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.
बेरोजगार तरुण, कर्जबाजारी शेतकरी आणि महागाईच्या तडाख्यातील शिक्षण, कमाई आणि आरोग्यासाठी झगडणाऱ्या गरीबांना न्याय मिळावा तर देशातील अनेक समस्यांना घेऊन अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खासदार राहुलजी गांधी यांनी दिनांक १४ जानेवारी २०२४ पासुन मणिपूर ते मुंबई अशी भारत जोडो न्याय यात्रा आयोजित केली आहे. याच धर्तीवर आर्णी – केळापूर विधानसभा मतदारसंघात युवा नेते जितेंद्रभाऊ मोघे यांच्या नेतृत्वात ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे. आज या यात्रेचा ३ दिवस केळापूर तालुक्यातील वाघोली येथे आज ही यात्रा आयोजित करण्यात आली असुन सकाळीं ०८.०० वाजता गावातील मुख्य चौकातून यात्रेची सुरूवात करण्यात आली.गावातील सर्व नागरिकांच्या घरोघरी जात त्यांच्याशी संवाद साधत. गावातील अडीअडचणी जाणून घेण्यात आल्या तर यावर तोडगा काढण्याच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली. गावात यात्रेचे आगमन होताच गावकऱ्यांच्या वतीने हर्षोल्लासात स्वागत करण्यात आले. तर गावकऱ्यांनी यात्रेतील सहभागी मंडळींशी विविध विषयांवर चर्चा केली.
प्रसंगी जितेंद्र मोघे, विष्णुभाऊ राठोड, बिषणसिंग सिंदो, मनोज भोयर प्रशांत भाऊ बोंडे, प्रेम राठोड, प्रशांत करलावार, अशोकभाऊ करलावार, प्रविणभाऊ आत्राम, रघुनाथभाऊ कनाके, प्रकाश आत्राम, बंडू वखरे, गणपत मेश्राम, प्रताप चव्हाण, जपसिंगभाऊ चव्हान, देविदास भाऊ राठोड जगदीश भाऊ लक्षशेट्टीवार, अनुपभाऊ आत्राम, दत्ताभाऊ चव्हान, मेरसिंग महाराज यांच्या सह गावतील सर्व माता -भगिनी व नागरीक उपस्थित होते..