आर्णी येथे यवतमाळ रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात संत सुश्री अलका श्री याच्या रामायण सुदंर कांड कार्यक्रमाचे आयोजन येथील अध्यात्मिक सेवा समिती कडून केल्या गेले होते.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला भाविक मंडळींनी उपस्थिती केली होती. या दरम्यान कार्यक्रमातून महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत,मंगळसूत्र, व इतर सुवर्ण आभूषण एकूण २८.५ ग्राम चोरीस गेल्याची फिर्याद सौ स्वाती रविशेखर महल्ले यांनी आर्णी पोलीस स्टेशन ला दिली ही घटना १३ जझनेवरी सायंकाळी घडली पण फिर्याद येताच आर्णी चे ठाणेदार पिलीस निरीक्षक केशव ठाकरे यानी वेगवान तपस चक्रे फिरवत वरसद्ध येथील चार महिला चोरट्याना अटक करून चोरीस गेलेला सर्व मुद्देमाल हस्तगत केला.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.पवन बन्सोड,अप्पर जिल्हा पोलीस अधिक्षक पियुष जगताप,उपविभागीय पोलीस अधिकारी व उप पोलीस अधीक्षक चुलमुला रजनीकांत यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक केशव ठाकरे,पोलीस उप निरीक्षक गजानन आजमिरे,पोलीस हवालदारयोगेश संकुलवार,सतीश चौधर, मनोज चव्हाण,म्हूला पोलीस हवालदार जया काळेपोलीस नाईक ऋषीकेध इंगळे, नफिस शेख, पोलीस शिपाई अक्षबागवंडे, मंगेश जगताप पिलीस महिला शिपाईदीपाली चव्हाण यांनी ही कारवाई केली
आर्णी पोलिसांची सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
