7k Network

शिरूर शहरातील मुख्य सराफ बाजारपेठेतील सराफ व्यवसायिकास अग्नीशस्त्राचा वापर करून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पुणे जिल्ह्यातून हद्दपार असलेला मोरक्या जेरबंद…!

संदीप ढाकुलकर
“शिरूर शहरातील मुख्य सराफ बाजारपेठेतील सराफ व्यवसायिकास अग्नीशस्त्राचा वापर करून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पुणे जिल्ह्यातून हद्दपार असलेला मोरक्या जेरबंद”
शिरूर पोलीस स्टेशन हद्दीत मुख्य बाजारपेठेत सुभाष चौकातील जगन्नाथ कोलते ज्वेलर्स दुकानाचे मालक अशोक कोलते व त्यांचा कामगार नामे भिका एकनाथ पंडित वय 50 राहणार शिरूर दिनांक 28/ 1 /2024 रोजी संध्याकाळी तुम्हाला दुकान बंद करत असताना मोटरसायकलवर अचानक दोन अनोळखी इसम आले व त्यांनी पिस्तूल चा धाक दाखवीत सोने लुटण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पंडित यांनी विरोध केल्याने अनोळखी इसमाच्या पिस्तूल मधून फायर केली त्याबाबत भिका एकनाथ पंडित यांनी पोलीस स्टेशन शिरूर येथे तक्रार केली. शिरूर पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर ६८ /२०२४ भा.द.वि.का.क.३०७,३९८ ,३२३,३४ भा.ह.का.क.३,२५,२७ फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम३,७ प्रमाणे गुन्हा दाखल केला. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने तात्काळ गुन्हा चार समांतर तपास सुरू करण्यात आला. माननीय श्री अंकित गोयल मावळते पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी तपासाच्या अनुषंगाने आवश्यक सूचना दिल्या. शहरातील मुख्य बाजारपेठेमध्ये घटना घडल्याने मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते

तपास पथकाने बाजारपेठेतील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासली असता आरोपी मध्ये रेकॉर्ड वरील बोलण्याच्या वर्णाचा इसम असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. गोपनीय माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा शरद बन्सी मल्हाव रा . शिरूर जिल्हा पुणे याने त्याचा साथीदार सागर उर्फ बबलू सोनलकर राहणार धायरी जिल्हा पुणे यांच्या मदतीने हा गुन्हा केल्या असल्याचे समजते. सदर आरोपी हे सिंहगड किल्ल्याकडे लपून बसल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली. तपास पथकाने सिंहगड किल्ल्यामध्ये मुख्य आरोपी शरद मल्हार राहणार काची आळी शिरूर जिल्हा पुणे यास पकडण्यात आले असून त्याच्याकडून तीन गावठी पिस्तूल आणि गुन्ह्यांमध्ये वापरलेली मोटर सायकल असा एक लाख पंधरा हजार दोनशे सात रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला त्याचा साथीदार सागर हा रुग्णालयात उपचार घेत असून त्याच्या अटकेचे सुद्धा वृत्त आहे . सदरचे दोन्ही आरोपी हे रेकॉर्ड वरील असून त्यांच्यावर सात गुन्हे दाखल आहे मुख्य आरोपी शरद मल्हाव पुणे आणि अहमदनगर जिल्हा येथून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेला होता. सदर आरोपीच्या तपासासाठी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शीळीमकर, गणेश जगदाळे, तुषार पंधरे, अमित भुजबळ, संदीप वारे, अक्षय तुपे यांनी तपास करून आरोपीस पकडले. सदर आरोपी हे रिमांडमध्ये असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गुंजाट साहेब आणि पोलीस शिपाई एकनाथ पाटील हे करीत आहे.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!