आर्णी सहकारी शेतकरी जिनिग प्रेसिंग ची सार्वत्रिक निवडणूक मोठया रंगतदार वळणावर असून या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने कार्यकर्ते नाराज होऊ नये म्हणून दोन पॅनल उभे केल्याचे चित्र असून दोन्ही पॅनल च्या पोस्टर वर काँग्रेस व शिवसेना व राष्ट्रवादी नेत्यांचे फोटो असल्याने शहरात या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे. ‘शेतकरी महा विकास आघाडी’ नावाने असलेल्या पॅनल मध्ये माजी अध्यक्ष भुपेंद्र उपाख्य बाळासाहेब शिंदे, शिवसेनेचे यापूर्वी चे संचालक अनिल चिंतावार, शिवसेनेचे सचिन धाये पाटील शेख जाफर,
नंदकिशोर राठी,अमोल मांगूळकर, श्रीमती संध्या प्रकाशराव देशमुख, पत्रकार प्रकाश बुटले,निवृत्त ए.आर.बाबुसिंग राठोड, संजय ठाकरे यासह रोशन सोलंकी आदी उमेदवार आहेत. तर दुसरीकडे शेतकरी जिनिग विकास आघाडी मध्ये काँग्रेस चे दिगग्ज नेते साजिद बेग काँग्रेस चे तालुकाध्यक्ष सुनील भारती, शिवसेनेचे रमेश इंगोले, राजेश कोठारी, रामचंद्र चव्हाण,गणपत राठोड,दिगंबर बुटले आदी उमेदवार उभे राहिले आहेत. आता दोन्ही पॅनल ला धुरंदर उमेदवार असल्याने क्रॉस वोटिंग करून काहीच ठरवून ‘गेम’ होण्याचा ‘नेम’ सांगता येत नाही.
आता एका पॅनल चे चिन्ह विमान असून विमान भुर उडते की एका पॅनल चे चिन्ह कपबशी आहे तर कपबशीतला चहा चा धूर निघते हे पहाणे मनोरंजक ठरणार आहे.
