बाबा कम्बलपोष दरगाह ट्रस्ट द्वारा आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचे मध्ये दरगाह ट्रस्ट आणि आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी मेघे यांच्या संयुक्त विद्यमाने बाबा कंबलपोष र. अ. यांच्या उर्स शरीफ निमित्त आयोजित सर्व रोग निदान व उपचार शिबिरात एकून ५५६ रुग्णाची तपासनी झाली. यातील ७६ रुग्णाची शस्त्रक्रिया साठी वर्गीकरण करण्यात आले.
यात नेत्ररोग, मेडिसीन अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग, त्वचारोग, सर्जरी विभाग यातिल डॉक्टर्स टीम सहभागी झाली होती.
प्रामुख्याने डॉ प्रफुल्ल वासनिक, डॉ गायत्री, डॉ इमरान, डॉ अपूर्वा दवे, श्री मुरलीधर उमाटे (मेडिकल सोशल वर्कर) आणि संपूर्ण टीम यानी आपली सेवा दिली.
यासह रोज रोग निदान व उपचार शिविर उर्स निमित्त दरगाह मध्य सुरू असणार आहे.