दिवसेंदिवस तरुणाई मधील संयम संपत चालल्याचे चित्र समोर येत असून जसे वाहनाच्या वेगावर नियंत्रण न ठेवता वेगात वाहन चालवण्याचा ट्रेंड सुरू आहे तसाच तरुणांच्या रागाच्या वेगावर देखील आता नियंत्रण सुटत चालले आहे.
एका तरुणांच्या वाहनांचा कट दुसऱ्या तरूणाला लागल्याने ज्या तरुणास कट लागला त्याने याविषयी जाब त्या दुचाकीस्वार तरुणास विचारला यावेळी दुचाकीवरून तो तरुण आपल्या प्रियसी बरोबर दुचाकीवरून जात होता
त्या दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला त्याच्या प्रियसी समोर जाब विचारल्याने अपमान वाटला तेव्हा तर तो दुचाकीस्वार तरुण तेथून निघून गेला पण अपमानाचा राग डोक्यात गेल्याने त्याने घरून येतांना देशी कट्टा सोबत आणून ज्या तरुणाने कट का मारला असा जाब विचारला त्याच्यावर गोळ्या झाडून हत्या केल्याची दुर्दैवी व खळबळजनक घटना यवतमाळात घडली.
याबाबत असे की मनीष याने घरी जाऊन देशी कट्टा घेऊन परत कळंब चौक येथे आला. मृत्यू झालेल्या शदाबला त्याने जाब विचारला. तेव्हा दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. आरोपी मनीष शेंद्रे याने त्याच्या जवळच्या देशी कट्ट्याने शादाबवर गोळी झाडली. त्यामध्ये खान याच्या छातीत गोळी लागली. त्याला लोकांनी तातडीने शासकीय रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान शादाब खान याचा मृत्यू झाला. या वेळी संतप्त नागरिकांनी आरोपीची दुचाकी पेटवून दिली.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार, स्थानिक गुन्हे शाखेचे आधार सिंग सोनोने, अवधूतवाडीचे ठाणेदार ज्ञानोबा देवकते, यवतमाळ शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार सतीश चवरे यांनी घटनास्थळ गाठले. शहरात अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण पथकाला घटनास्थळी बोलविण्यात आले. असून कलंब चौक व परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
कोणी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.