सद्या देशात व राज्यात जी स्थिती निर्माण झाली आहे पहाता संविधानाच्या रक्षणासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते शिवाजीराव मोघेयांनी केले.
रुपेश कल्यामवार यांची तालुका काँग्रेस कमिटी घाटंजीच्या अध्यक्ष पदी तर आकाश आत्राम यांची आदिवासी विकास परिषदेच्या यवतमाळ जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याने या दोन्हीं नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा आज जगदंबा देवस्थान तरोडा येथे ग्रामस्थ व समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत राज्याचे माजी मंत्री तथा आदिवासी काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड शिवाजीराव मोघे साहेब होतें. यावेळी ते बोलत होते राजकारण आणि समाजकरणाच्या माध्यमांतून समाजातील वंचित, उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी दोघांनीही कार्यरत राहावे असे म्हणत साहेबांनी दोघांना ही पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी मा. जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव मेश्राम, स्वामीभाउ काटपेलीवार, वैजयंतीताई ठाकरे, इकलाक खान, अरविंदभाऊ चौधरी, संजयभाऊ आरेवार यांच्या सह आयोजक विठ्ठल नैताम, भारत वाडगुरे प्रशांत गावंडे, संतोष नेवारे, वामन खंदारे यांच्या सह सर्व सदस्य उपस्थित होते..
