आमरण उपोषण हे ब्रिटिशांच्या काळात महात्मा गांधीजी याचे प्रभावी अस्त्र होते
लोकशाही व्यवस्थेत देखील उपोषणास कायदेशीर न्याय मागण्याचा अहिंसात्मक मार्ग समजल्या जात होता पण आर्णीत एक वृद्ध समाजसेवकाने जनहितार्थ सुरू केलेल्या उपोषणाची प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने आर्णी शहरात प्रशासना विरुद्ध रोष वाढत चालला आहे.
प्रल्हादराव इंगळे वय ७५ या वृद्ध समाज सेवकाने आर्णी पोलीस स्टेशन ला महसूल विभागाने ५८ आर जमीन अवंटीत करून दिली पण प्रत्यक्षात जेव्हा मोजणी केली तेव्हा ती जागा ४३ आर एव्हढीच भरली.
वास्तविक जी जागा आर्णी शहरासाठी ‘प्रेमनगर’ नावाने कलंक होता त्या जागेत देहविक्रय जुगार,मटका आदी अवैध व्यवसाय वर्षानुवर्ष चालायचे मोक्याच्या ठिकाणी असलेली सोन्याचा भाव असलेली ही जागा
तत्कालीन पोलीस निरीक्षक आर्णी ठाणेदार पितांबर जाधव यांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कोणाच्याही विरोधाला न जुमानता पोलीस फोर्स ने रिकामी करून घेतली
त्या जागेवर कुंपण घातले आणि मोठया परीश्रमाने पाठपुरावा करून थेट मुंबई पर्यंत जाऊन जागा पोलीस स्टेशन च्या इमारतीच्या कामी मिळवली.
त्यामुळे १०० वर्ष जुन्या पोलीस स्टेशनला नवी हक्काची जागा मिळाली व आता या ठिकाणी पोलीस कार्यालयाची इमारत पोलीस कर्मचारी अधिकारी निवासस्थान होईल असे वाटत असताना महसूल विभागाने घोळ घातला आणी कुठलीही मागणी नसतांना आयत्या पिठावर रेघोट्या मारून १५ आर जागा त्यांच्या कामी राखीव दाखवली.
ही बाब जेव्हा समाजसेवक प्रल्हाद इंगळे यांच्या लक्षात आली तेव्हा त्यानी यवतमाळ येथे पूर्ण जागा पोलीस स्टेशनला मिळावी
म्हणून उपोषन केले.तेव्हा महसूल विभागाने लेखी आश्वासन देऊन उपोषण सोडविले होते
मात्र लेखी आश्वासन देऊन सुद्धा कारवाई होत नसल्याने प्रल्हाद इंगळे यांनी पुन्हा आर्णी तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले. गेली १० दिवस हे उपोषण सुरू आहे.
या उपोषणास व मागणीस पाठिंबा म्हणून आर्णी बाजारपेठ अर्धा दिवस बंद होती पण निर्ढावलेल्या प्रशासनाने कुठलीच दखल घेतली नाही
आमरण उपोषण करून मिळत नाही ‘न्याय’ तर मग जगून फायदा ‘काय’ अशी धरण गांधीवादी समाजसेवक वृद्ध प्रल्हाद इंगळे यांनी आता थेट आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे
जर तरी प्रशासन जागे होत नसेल तर आर्णी शहरात मोठे जण आंदोलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
