माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री व राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष ना.हंसराज अहिर याचे कट्टर समर्थक भाजप चे निष्ठावान पदाधिकारी विशाल देशमुख यांची आर्णी भाजप च्या शहराध्यक्ष पदी युवा नेते विशाल देशमुख याची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप चे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी एका पत्राद्वारे ही निवड जाहीर केली आहे.
आर्णी शहरात दुर्गोत्सव मंडळाचे माध्यमातून विविध अध्यात्मिक कार्यक्रम व उपक्रमांचे विशाल देशमुख सातत्याने आयोजन करत असतात त्यांच्या निवडी बद्दल भाजप मधील कार्यकर्ते,पदाधिकारी यांच्या कडून देशमुख यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
