यवतमाळ जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस आर्णी-केळापूर मतदार संघाचे युवा नेते जितेंद्र मोघे यांच्या हस्ते घाटंजी तालुक्यातील मानोली येथे कृकेत च्या सामन्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मैदानावर बॅट हातात घेऊन जितेंद्र मोघे यांनी फटकेबाजी करून खेळाचा आनंद लुटला.
या वेळीघाटंजी चे माजी नगराध्यक्ष किशोरजी दावडा, मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ चे संचालक आशीष लोणकर, घाटंजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अभिषेक ठाकरे,
घाटंजी चे माजी नगराध्यक्ष सुभाष गोडे,घाटंजी तालुका काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष रूपेश कल्यमवार,माणोली चे माजी सरपंच गुणवंत लेनगुरे,पुंडलिक लेनगुरे,मंगेश कोमावर, विष्णू वाढई, राजू भाऊ, नवनीत खोब्रागडे, मंडळाचे अध्यक्ष प्रसाद वाढई, उपाध्यक्ष सार्थक भोयर, सचिव प्रेम मोहारले, तसेच आयोजक
कार्तिक भोयर,क्रीडा प्रमुख ईश्वर सोनूले, राम शेंडे व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
