तुहा विठ्ठल बरवा,तुहा माधव बरवा… विठोबा रुखमाई, जय जय विठोबा रुखमाई म्हणत हरी पाठाने आपल्या मंजुळ व खड्या आवाजात मंत्रमुग्ध करणारी कीर्तनाची सुरवात महाराष्ट्रात नावाजलेल्या युवा हरी भक्त परायण शिवलीला ताई पाटिल यांनी केली
लयबद्ध साथ संगत पखवाज आणि कीर्तनात ठेका धरणारे कीर्तनात रंगलेली बाल साथी यामुळे कीर्तनाची सुरवातच हरी नामाच्या सोबत झाल्याने पुढे शिवलीला ताईंचे किर्तन अधिकच रंगतदार झाले
तरुणांनी व्यसनाधीनता सोडावी व्यसनाधीनता माणसाच्या आयुष्याची राखरांगोळी करते म्हणत व्यसनमुक्त समाज घडून ईश्वराची भक्ती करा असे सांगून विविध विनोदी किस्से सांगत हजारो उपस्थित महिला पुरुषांना हास्यात बुडवले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरापगड जातींच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केले असे सांगत
शिवबानं मूठभर मावळे व शेतकऱ्यांची मुले घेऊन बलाढ्य मुघलांचा पराभव करत गडकिल्ले जिंकले सांगत
‘प्रचंड संपत्ती असणाऱ्या रावणाला सुध्दा प्रभू रामचंद्र यांच्या चरणावर मस्तक ठेवावे लागले’…
म्हणून गर्व व अभिमान करू नका भक्तीचा मार्ग धरा
जगाच्या मालकाला म्हणजे ईश्वराला शरण जा असे आवाहन शिवलीलाताईने केले
एखादा माळ उत्पादन करणाऱ्याला त्याच्या वस्तूचा भाव ठरवण्याचा अधिकार असतो पण शेतकऱ्यांना मात्र उत्पादन केलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार नाही म्हणून शेतकरी अडचणीत आला. म्हणत खचून जाऊ नका
शेतीला जोडधंदा करा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
दुसऱ्याची खोड काढण्याची वाईट खोड सोडून द्या असे म्हणत
व्यसनमुक्ती, शेतकरी, आध्यत्मिक व महिला समानता व संस्कार,संस्कृती अशा चौफेर विषयाला आपल्या खास शैलीत
विशद करत अनेक गमतीदार किस्से सांगत आर्णीकरांचे मंनं जिंकली
कीर्तनाच्या वेळी मोठया संख्येने मुस्लिम युवक व प्रौढ बांधव उपस्थित होते ही बाब कम्बलपोष उर्स ची किमया असल्याचे शिवलीला पाटील म्हणाल्या.
कव्वालीत हिंदू तर कीर्तनात मुस्लिम असा हा सामाजिक एकतेचा संदेश देणारा आर्णी चा उर्स याही वर्षी मोठया उत्साहात सुरू झाला असून आर्णी तालुका, यवतमाळ जिल्हा व जिल्ह्या बाहेरील भाविक उर्स ला हजेरी लावतात हे विशेष.
