समाज कल्यान विभागाच्या वसतिगृह अधीक्षकांना तुटपुंजा पगार (मानधन)मिळते पण याही पगारात वसतिगृहातील गरीब,गरजू विद्यार्थ्यांना शिस्तीचे धडे देत त्यांच्यावर मायेचे संस्कार करत अनेक गरीब,गरजू विद्यार्थ्यांना घडवणारे पुरुषोत्तम इंगोले हे श्री महंत दत्तराम भारती वसतिगृह अधीक्षक म्हणून वयतमानानुसार सेवानिवृत्त झाले.
वसतिगृहात जेव्हा विध्यार्थी प्रवेश घेतो तेव्हा वसतिगृहात अधीक्षक हेच विद्यार्थ्यांचे पालक असतात या विद्यार्थ्यांवर शिस्त,देखरेख त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जवाबदारी अधीक्षकांची असते.शाळेतील अभ्यासा सोबत विद्यार्थ्यांची खबरदारी व जवाबदारी देखील वसतिगृहात अधीक्षकांची असते.
पुरुषोत्तम इंगोले हे एक आदर्श वस्तीगृह अधीक्षक ठरले त्यानी अनेक विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन आपल्या सेवा काळात केले वेळेवर कधीही कुठल्याही अडचणीत माय बाप पालक बनून विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहिले त्यांच्या सेवा काळात अनेक विद्यार्थी घडले अनेकांनी उच्च शिक्षण घेतले काही डॉक्टर इंजिनिअर शिक्षक पोलीस अशा पदाच्या नोकरी वर लागले ते सर्व इंगोले सरांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त करतांना दिसतात
श्री.महंत दत्तराम भारती वसतिगृहातील रका विद्यार्थ्याने जो प्राध्यापक झाला आपल्या लाडक्या इंगोले सर बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या त्या त्याच्याच शब्दात….वाचा
आदरणीय श्री इंगोले सर,
सर्वप्रथम मी आमच्या सारख्या तुमच्या असंख्य विद्यार्थ्यांतर्फे तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो.मला आजही आठवतो तुमचा वसतिगृहात असतानाचा दरारा. तुम्ही सतत गावाखेड्यातून वसतिगृहात शिकायला आलेल्या मुलांचे भविष्य उज्ज्वल व्हावे, त्यांनी चांगला अभ्यास करून कुठेतरी आयुष्यामध्ये एक सन्मानाचा पल्ला गाठावा यासाठी प्रयत्न करायचा.कधी कधी कठोर बाप होऊन चांगला चोप ही दिला तर कधी प्रेमाने, मायेने पाठीवर शाबासकीची थाप दिली.आज लक्षात येते की तेव्हा तुमचा वाटणार धाक, तो दरारा खराखुरा नव्हता तर आम्हाला शिस्त लागावी ,आयुष्यामध्ये आम्ही सुद्धा एक चांगले सन्माननीय नागरिक बनलो पाहिजे यासाठी आपण जाणीवपूर्वक हे सर्व करत होतात.खरच सर, तुमची शिस्त, मुल लहान वयात आई वडील सोडून वसतिगृहात येतात म्हणून सना सुदीला त्यांना फिष्ट मिळावी अशा एक ना अनेक छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही धडपड करत होतात. एका क्षणाला वाटायचं की सर किती कडक आणि कठोर आहे शनिवार – रविवार ला घरी सुद्धा जाऊ देत नाहीत पण दुसऱ्याच क्षणाला वस्तीगृहाच्या मुलांना कोणी वाकड्या नजरेने बघितले की त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलात.जेव्हा मायेची गरज होती तेव्हा माया केलीत आणि जेव्हा शिस्तीची गरज होती तेव्हा शिस्त लावलीत.तुम्ही लाऊन दिलेल्या शिस्तीमुळे आणि चांगल्या सवयी ( अर्थात आमच्या क्षमतेनुसार जितक्या चांगल्या सवयी आत्मसात करता आल्या तेवढ्या) मुळे आम्ही आज आयुष्यात काही ना काही वेगवेगळ्या क्षेत्रात आमचं योगदान देण्याचा प्रयत्न करत आहोत.अस म्हणतात बालवयात किंवा किशोरवयात जे संस्कार व्यक्ती वर पडतात ते कायमस्वरूपी त्याच्या सोबत राहतात . त्या वयात आम्ही तुमच्या सानिध्यात होतो, आमच्या जडणघडणीत जेवढा वाटा आमच्या आई वडिलांचा आहे तेवढाच तुमचा सुद्धा आहे.त्यावेळी आम्हाला शिकवणाऱ्या काही शिक्षकांचे नावे आम्हाला आता आठवत सुद्धा नाही परंतु जेव्हा जेव्हा आम्ही एक मेकांना भेटतो तेव्हा तुमचा विषय निघाला नाही असं कधी होत नाही.( सर्वांचं एकच वेळी भेटन शक्य होत नाही) तरीही वसतिगृह, तेथील गमती जमती हा आमच्या चर्चेतील मुख्य विषय असतो.एकत्र या दिवाळी मध्ये वसतिगृहात जाऊ असे अनेक मित्रांचे ठरले पण ते प्रत्यक्ष घडू शकले नाही. पण मी , निकेत राठोड आणि इतर काही मित्र दिवाळीच्या सुट्टी मध्ये बंद वस्तीगृहाच्या दाराला आणि अनंता भाऊ ची भेट घेऊन आलो.आम्ही सगळे मिळून येऊ आणि सरांनी सुद्धा वेळ काढावा आणि वसतिगृहात शक्य असेल तर आम्हालाआपल्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करता यावी यासाठी एक छोटासा get together व्हावं अशी आमची इच्छा आहे .तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी आम्ही स्मरणात ठेऊन शक्य तितक्या प्रमाणात त्याचे पालन करू.तुम्ही सदैव आमच्या साठी आदरणीय होतात आणि राहाल सर.ईश्वर आपणास निरोगी ठेवो. आणि सदैव तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहो.
तुमचे खूप खूप धन्यवाद सर
आपला विद्यार्थी
प्रा.विकास राठोड(अमरावती)
पुरुषोत्तम इंगोले सरांना भावी आयुष्याच्या बोल महाराष्ट्र च्या हार्दिक शुभेच्छा…!
प्रमोद कुदळे