गेल्या ७५ वर्षात जे मराठा समाजाला मिळालं नाही ते समाजाच्या एकजुटीने आज मिळणार आहे सगे सोयऱ्यांचा कायदा होईलच पण या दरम्यान राजकीय लोकांना मी नको आहे. यात काही पाच पन्नास आमच्यातीलही आहेत असे स्पस्ट मत मनोज पाटील जरांगे यांनी व्यक्त केले. मी एव्हढ आंदोलन चालुऊन एक १६०० रुपयांची सायकल घेऊ शकलो नाही कारण मी मराठ्यांच खात नाही पण आमच्यातील काहींना पाच पन्नास टोळक्यानं हा प्रश्न चिघळत ठेवायचा आहे.पण सगे सोयऱ्यांचा अध्यादेश पहिल्यांदा कायद्यात रूपांतरीत होणार आहे त्यामुळे माझ्या गोर गरीब मराठ्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला शिवाय माघार नाहीच ही ठाम भूमिका मनोज पाटील जरांगे यांनी मांडली
