कॅन्सरची लागण झाल्याचे निदान प्राथमिक टप्प्यात होताच वेळेवर उपचार घेतल्यास तो पूर्ण बरा होऊ शकतो. मात्र अनेकांना सुरुवातीला या आजाराची कल्पनाच येत नाही. म्हणून डोंबिवलीतील गोपाल कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट, अनिल आय हॉस्पिटल आणि अनिल कॅन्सर क्लिनिक यांच्या वतीने डोंबिवलीत प्रथमच येत्या १५ ऑक्टोबरपासून कॅन्सरचे निदान करणारी व्हॅन सुरू केली जाणार आहे.
ग्रामीण भागात ही व्हॅन फिरणार आहे. धर्मादाय तत्वावर विशेषतः आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या नागरिकांसाठी ही सुविधा दिली जाणार असल्याचे कॅन्सर रोगतज्ज्ञ डॉ. अनिल हेरुर यांनी सांगितले. कॅन्सरच्या निदानासाठी खासगी रुग्णालयात १८०० ते २५०० रुपयांपर्यंत खर्च होतो. मात्र या मोबाइल व्हॅनमधून ५०० ते ७०० रुपयांत कॅन्सरचे निदान करता येऊ शकेल. यासाठी सामाजिक संस्थांना आवाहन करण्यात आले आहे. या मोबाइल व्हॅनची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्यास अनेक रुग्णांचा जीव वाचू शकेल.
मुंबईत इंडियन कॅन्सर सोसायटी आणि हेल्पिंग हॅड्स या दोन संस्थांकडून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी दोन व्हॅन सुरू आहेत. मात्र त्यांची तारीख मिळणे अवघड असल्याने उपनगरात या व्हॅनची सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही. या दोन्ही व्हॅन आकाराने मोठ्या असल्याने खेडेगावातील अरुंद रस्त्यांवर चालविणेदेखील कठीण आहे. त्यामुळे या नव्या व्हॅनमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना गावागावांत सुविधा मिळणार आहेत. व्हॅनमध्ये स्तनांचा कॅन्सर, गर्भाशयाच्याकॅन्सरची लागण झाल्याचे निदान प्राथमिक टप्प्यात होताच वेळेवर उपचार घेतल्यास तो पूर्ण बरा होऊ शकतो. मात्र अनेकांना सुरुवातीला या आजाराची कल्पनाच येत नाही. म्हणून डोंबिवलीतील गोपाल कृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट, अनिल आय हॉस्पिटल आणि अनिल कॅन्सर क्लिनिक यांच्या वतीने डोंबिवलीत प्रथमच येत्या १५ ऑक्टोबरपासून कॅन्सरचे निदान करणारी व्हॅन सुरू केली जाणार आहे.
ग्रामीण भागात ही व्हॅन फिरणार आहे. धर्मादाय तत्वावर विशेषतः आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या नागरिकांसाठी ही सुविधा दिली जाणार असल्याचे कॅन्सर रोगतज्ज्ञ डॉ. अनिल हेरुर यांनी सांगितले. कॅन्सरच्या निदानासाठी खासगी रुग्णालयात १८०० ते २५०० रुपयांपर्यंत खर्च होतो. मात्र या मोबाइल व्हॅनमधून ५०० ते ७०० रुपयांत कॅन्सरचे निदान करता येऊ शकेल. यासाठी सामाजिक संस्थांना आवाहन करण्यात आले आहे. या मोबाइल व्हॅनची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचल्यास अनेक रुग्णांचा जीव वाचू शकेल.
मुंबईत इंडियन कॅन्सर सोसायटी आणि हेल्पिंग हॅड्स या दोन संस्थांकडून नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी दोन व्हॅन सुरू आहेत. मात्र त्यांची तारीख मिळणे अवघड असल्याने उपनगरात या व्हॅनची सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही. या दोन्ही व्हॅन आकाराने मोठ्या असल्याने खेडेगावातील अरुंद रस्त्यांवर चालविणेदेखील कठीण आहे. त्यामुळे या नव्या व्हॅनमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना गावागावांत सुविधा मिळणार आहेत. व्हॅनमध्ये स्तनांचा कॅन्सर, गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर तसेच पुरुषांच्या मुखाचा कॅन्सर आणि त्याचबरोबर कॅन्सरसाठी रक्ततपासणी करणारी सेवा पुरविली जाणार आहे. यामध्ये एक्सरे मशिनही असेल. मुखाचा कॅन्सर तसेच पुरुषांच्या मुखाचा कॅन्सर आणि त्याचबरोबर कॅन्सरसाठी रक्ततपासणी करणारी सेवा पुरविली जाणार आहे. यामध्ये एक्सरे मशिनही असेल.
या संदर्भात ज्योती कँसर रिलीफ सेंटर चे सतीश मुसकुंदे
यांनी यासाठी नागपुर येथे हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी उपोषण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना निवेदन देखील दिले होते.