भारतीय संविधान बदलण्याचे भाजप मंत्र्यांचे जाहीर वक्तव्य सरकार कडून होणारा सत्तेचा गैरवापर,अल्पसंख्याक, आदिवासी शेतकरी प्रश्नाला दिलेली बगल,वाढती महागाई बेरोजगारी आदी प्रश्नावर चर्चा करून ह्या समस्यांना संसदेत वाचा फोडेल असे आश्वासन वाशिम यवतमाळ लोकसभा मतदार संघाचे उमेदवार संजय देशमुख यांनी समिनाताई शेख याच्या निवासस्थानी दिलेल्या भेटी दरम्यान चर्चा करतांना दिले.यवतमाळ जिल्ह्यात रोजगार निर्मिती साठी नवे प्रकल्प कसे आणता येतील याबाबत प्रयत्न करू असेही देशमुख यावेळी म्हणाल्या.
यवतमाळ चे लोकनेते मा. बाळासाहेब मांगुळकर यांच्या सोबत यवतमाळ वाशिम लोकसभेचे इंडिया आघाडी चे उम्मेदवार मा.संजय भाऊं देशमुख यांची माहाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी चे मिडिया पॅनालीस्ट समीना हाजी खालीक शेख यांच्या यवतमाळ येथील निवासी स्थानी भेंट दिली या प्रसंगी त्याचा यथोचित सुताचा हार व खादी चा शेला देऊन सत्कार सुध्दा करण्यात आले या प्रसंगी माहाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यक चे सचिव हाफीज भाई, शिवसेना नेते भाई आमन,सामाजिक कार्यकर्त्त खालीक शेख उपस्थित होते.