शेतकऱ्याच्या प्रश्नाअवर नेहमीच आक्रमक लढा देणारे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला असून तसे पत्र प्रहार जनशक्ती पक्ष प्रमुख आमदार बच्चू भाऊ कडू याना पाठविलेल्या पत्रात जाहीर पाठिंबा जाहीर करून अमरावती जिल्ह्यातील सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते हे प्रस्थापित पक्षाच्या विरुद्ध दिवसरात्र काम करतील असा विश्वास देखील व्यक्त केला.यापूर्वी राज्यात शेतकरी प्रश्नावर माजी खासदार राजू शेट्टी व आमदार बच्चू भाऊ कडू यांनी एकत्र आंदोलन केलेली आहेत.वरुड मोर्शी चे आमदार देवेंद्र भुयार हे २०१९ ला स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून निवडणूक लढवली होती.आणि आमदार झाले होते आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाठिंब्या मूळे दिनेश बुब यांचा विजय अजून सुकर झाल्याचे चित्र आहे.
