चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघात ही जागा महाविकास आघाडीत काँग्रेस ला सुटली महा विकास आघाडीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटा चा समावेश आहे.महा विकास आघाडी त युतीचा आघाडी धर्म पाळत शिवसेनेचे माजी आमदार माजी यवतमाळ जिल्हाप्रमुख बाळासाहेब मुनगिनवार यांनी उमेदवार प्रतिभा ताई धानोरकर यांच्या प्रचारात स्वतःला झोकून दिले
दिवसरात्र तरुण कार्यकर्त्यास लाजवेल एव्हढ्या ऊर्जेने त्यानी संपूर्ण आर्णी शहर व तालुका पिंजून काढला ठिकठिकाणी बैठका घेतल्या सभा घेतल्या यामुळे रियाज सय्यद नावाच्या एका सहकारी मित्राने त्यांची धडाडी पाहून त्यांचे काम प्रेरणादायी असल्याचे म्हटले आहे.सोशिअल मीडियातून प्रतिभा ताई विजयी होणार असून या विजयात बाळासाहेब मुनगिनवार यांचा सिंहाचा वाटा असेल असेही मत अनेकांनी व्यक्त केले आहे.