आज सर्वत्र लोकशाही पायदळी तुडवण्याचा एकमेव कार्यक्रम सत्ताधारी पक्षाकडून होत आहे.गेली दहा वर्षे महागाई शेतमालाचे पडलेले बाजारभाव व बेरोजगारी हे संकट देशासमोर उभे असतांना आज ही निवडणूक नसून हुकूमशाही विरुद्ध लोकशाही ची लढाई आहे म्हणून मला विजयी करून ही लढाई आपण जिंकावी असे आवाहन सावळी येथील जाहीर सभेत काँग्रेस महा विकास आघाडीच्या चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रातील उमेदवार प्रतिभा ताई धानोरकर यांनी उपस्थित मतदारांना केले
सावळी येथे झालेल्या प्रचार सभेत
माजी मंत्री शिवाजीराव मोघे उभाठा नेते किशोर तिवारी माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष वर्षाताई निकम शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे जिल्हा माझी परिषद उपाध्यक्ष मुबारक तंवर जितेंद्र मोघे सावळी चे सरपंच बाळासाहेब शिंदे डॉक्टर रामचरण चव्हाण राष्ट्रवादी एस पी आर्णी तालुकाध्यक्ष सुनील पोतघंटवार मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.