उत्तर प्रदेशातील अयोध्येत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्या नंतर राम जन्मभूमीत प्रचंड अद्वितीय भव्य अद्भुत प्रभू श्रीराम मंदिर उभारले २२ जानेवारी ला या मंदिराच्या उद्घाटन समारंभ पार पडला होता.त्यानंतर ही पहिलीच राम नवमी साजरी होत असून कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या प्रभू रामाच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविक अयोद्येत दाखल झाले आहे. आज देशात सर्वच राज्यातील शहर व ग्रामीण भागातील गावा मध्ये मोठया उत्साहात राम नवमी साजरी होणार आहे.त्यानिमित्ताने भव्य शोभा यात्रा सुद्धा निघणार आहे. विविध राम मंदिरात आज सकाळपासून भक्तांनी दर्शनासाठी रीघ लावल्याचे चित्र आहे.लोकसभेची निवडणूक होत असल्याचा पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून विविध कार्यक्रमात हजेरी लावण्यासाठी स्पर्धा लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.
