7k Network

आर्णी विधानसभा मतदारसंघात ह्या बाबी ठरणार काँग्रेस साठी गेम चेंजर..!

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या निवडणुकीचा प्रचाराच्या तोफा आज सांयकाळी ६ वाजता थंडावणार आहे.चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस व भाजप कडून जोरदार प्रचार करण्यात आला.

२०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप व शिवसेना युती असल्याने आर्णी विधानसभा मतदारसंघात  तत्कालीन उमेदवार हंसराज अहीर यांना मोठी मतांची आघाडी मिळाली होती.पैकी २०१४ ला अहीर हे विजयी झाले होते.मात्र २०१९ ला ते पराभूत झाले पण तरीही आर्णी विधानसभा मतदारसंघात   अहीर यांना मोठी मतांची आघाडी होती.

त्यावेळी आर्णी विधानसभा मतदारसंघात  भाजप आमदार प्रा.राजू तोडसाम होते आणि भाजप सेनेची युती असल्याने शिवसेनेची भाजप ला साथ होती.आणि उमेदवार हंसराज अहीर याची भाजप संघटनेत चांगली पकड होती त्यांचा समर्थक चाहता वर्गही मोठया प्रमाणात होते आणि आहेत.

२०२४ च्या निवडणुकीत मात्र कॉंग्रेसला  आर्णी विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण यावेळी महा विकास आघाडी असल्याने काँग्रेस सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट एकत्र आले आहेत व माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी पूर्ण मतदारसंघात मोठी मेहनत घेतली.शिवसेना उबाठा नेते माजी आमदार बाळासाहेब  मुनगीनवार  जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे यांनी पूर्ण आर्णी तालुका पिंजून काढला.

शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून माजी आमदार ख्वाजा बेग सावळी परिसरातील जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर तालुका अध्यक्ष सुनील पोतगंटवार शहर अध्यक्ष सादिक शेख यांनीही प्रचारात झोकून दिले.शिवसेना उबाठा चे उपजिल्हाप्रमुख रवी राठोड,माजी पंचायत समिती सदस्य रमेश ठाकरे,तालुका प्रमुख उज्वल मोरे शहर प्रमुख पंकज शिवरामवार यांच्या सह सर्वच पदाधिकारी या निवडणुकीत झटले.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील काँग्रेस चे आर्णीतील माजी नगराध्यक्ष अनिल आडे,आरीज बेग तालुका अध्यक्ष सुनील भारती, सावळी चे नेते बाळासाहेब शिंदे डॉ.रामचरण  चव्हाण किशोर भगत संजय राऊत व जीतेंद्र मोघे लोनबेहळ सर्कल मध्ये प्रदीप वानखडे,व सर्व पदाधिकारी एकत्र येत मोठी मेहनत घेतल्याचे चित्र होते.

जवळा लोणी जिल्हा परिषद गटात आर्णी पंचायत समितीचे माजी सभापती राजू विरखडे विजय मोघे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे विजय राठोड,जवळ्याचे भारत काळबांडे काँग्रेस नेते गणेश मोरे,राजू गावंडे शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांनी गावागावातील लोकांच्या भेटी घेत प्रचार केला असल्याने व सर्वात महत्वाचे म्हणजे माजी आमदार प्रा.राजू तोडसाम यांनी काँग्रेस उमेदवार प्रतिभा ताई धानोरकर यांना पाठिंबा जाहीर करून प्रचारा साठी पूर्ण आर्णी विधानसभा मतदारसंघात बैठका घेतल्या. त्यामुळे यावेळी ह्या सर्व बाबी काँग्रेस साठी गेम चेंजर ठरणार असल्याचे बोलले जाते.

आर्णीत झालेल्या शेवटच्या सभेला मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला यावेळी झालेल्या सभेत प्रतिभा ताई धानोरकर म्हणाल्या की मी आमदार म्हणून माझ्या विधानसभा क्षेत्रात मोठया प्रमाणात विकास कामे करून जनतेची सेवा केली तसाच विकास लोकसभा क्षेत्रात करून लोकांच्या सेवेसाठी काम करेन..

या वेळी सभेला माजी मंत्री शिवजीराव मोघे,काँग्रेस च्या महिला प्रदेशादयक्ष संध्याताई सव्वालाखे,राष्ट्रवादी शरद पवार गटाच्याया जिल्हाद्यक्ष  वर्षांताई निकम, आमदार बाळासाहेब मुंनगिनवार माजी आमदार ख्वाजा बेग, शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे आर्णी चे माजी प्रथम नगराध्यक्ष अनिल आडे,यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष काँग्रेस युवा नेते मनिष पाटील आदींनी संबोधित केले.सूत्र संचलन युवक काँग्रेसचे माजी पदाधिकारी व शेतकरी जिनिग चे संचालक अमोल मांगूळकर यांनी केले.

सभेला निर्भय बनो टीमचे पुरुष व महिला सदस्य यावेळी उपस्थित होते. जेष्ठ नेते उद्धव राव भालेराव,नालंदा भरणे,विजय मोघे,माजी नगराध्यक्ष अरीज बेग यांच्या सह मोठया संख्येने नागरिक मतदार महिला पुरुष हजारो च्या संख्येने उपस्थित होते. वारे पंजा आया पंजा च्या घोषणाबाजी यावेळी करत वातावरण दणाणून सोडले.प्रतिभा धानोरकर यांच्या सभेमुळं आर्णी शहरातील वातावरण पंजा मय झाले होते.

 

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!