प्रहार दिव्यांग संघटनेचे विविध मागण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन….
मागण्या मान्य न झाल्यास जागरण गोंधळ व तिरडी आंदोलनाचा दिला इशारा
जळकोट प्रतिनिधी :- विश्वनाथ शिंदे
दिव्यांगाणा स्वातंत्र्य सिधापत्रिका देऊन त्यांना अंत्योदय योजनेमध्ये समाविष्ट करणे, दिव्यांग रॅम्प, दिव्यांग मानधन, दिव्यांगाची होणारी हेळसांड आधी सह विविध मागण्या लवकरात लवकर मान्य करण्यात याव्या अन्यथा दि. 7 ऑक्टोंबर रोजी जळकोट तहसील कार्यालयासमोर तहसीलदार व प्रशासनाची तिरडी काढून जागरण ,गोंधळ आंदोलनाचा इशारा प्रहार दिव्यांग संघटना जळकोटच्या वतीने जळकोट तहसीलदार यांना यांना दि. 19 सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
जळकोट तहसिल कार्यालय येथील दिव्यांग विना अडथळा रॅम्प मोकळा करणे, दिव्यांगांना देण्यात आलेल्या शिधापत्रिका अद्याप चालू करण्यात आल्या नाहीत व त्यांना अंत्योदय मध्ये समाविष्ट करण्यात आले नाही जळकोट तहसील कार्यालयामार्फत तालुक्यातील तलाठी यांनी मागील वर्षी गावनिहाय दिव्यांगाची यादी तयार करून, दिव्यांगांना शिधापत्रिका वाटप केल्या नाहीत. तसेच दिव्यांगाचे अर्ज, मानधनास वारंवार विलंब व तहसील कार्यालयात दिव्यांग्याची होणारी हिडसांड याबाबत प्रहार दिव्यांग संघटना जळकोटच्या वतीने वारंवार निवेदन देऊन योग्य ती दखल घेतली जात नाही व जिल्हाधिकारी लातूर यांच्या पत्राद्वारे जळकोट तहसील कार्यालयास सूचित करूनही सदरील पत्रांना केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
तरी मा. तहसीलदार यांनी या निवेदनाची योग्य ती दखल दि. 1 आक्टोंबर 2024 पर्यंत घेतली नाही तर दि. 7 ऑक्टोबर रोजी प्रहार दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्य शाखा जळकोट च्या वतीने तहसीलदार व प्रशासनाची तिरडी काढून व जागरण गोंधळ घालून जळकोट तहसील कार्यालयातील दिव्यांग विनाअडथळा रॅम्प जवळ हे आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी. होणाऱ्या परिणामास सर्वस्वी तहसीलदार व प्रशासन जबाबदार राहील तसेच या आंदोलनादरम्यान आंदोलन कर्त्या दिव्यांगांना काही झाल्यास जबाबदार तहसीलदार व प्रशासन राहील असे तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी प्रहार दिव्यांग संघटना जळकोट तालुकाध्यक्ष माधव होणराव, तालुका सचिव नामदेव केंद्रे, प्रहार विद्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष विश्वनाथ शिंदे तालुका उपाध्यक्ष जनार्दन घुळे, ओमकार मठपती, ईश्वर पेठकर, प्रतीभा परीट ,आदीसह पदाधिकारी व दिव्यांग कार्यकर्ते उपस्थित होते .
प्रहार दिव्यांग संघटने मार्फत मागील अनेक वर्षापासून दिव्यांगाना त्यांचे हक्क, अधिकार मागण्या व योजना याबाबत अनेक आंदोलने केली आहेत. शासन परिपत्रक असून सुद्धा दिव्यांगांना शिधापत्रिका, दिव्यांगांना अंत्योदय योजनेमध्ये समाविष्ट करणे हे कार्यालयातील अधिकारी कर्मचारी दुर्लक्ष करतात आज तहसील कार्यालयाकडे दिव्यांगाची यादी पण नाही. मागील वर्षी गावनिहाय यादी तलाठ्या मार्फत करण्यात आली होती जळकोट तहसीलदार यांनी लवकरात लवकर वरील आमच्या मागण्या मान्य नाही केल्यास संबंधित तहसीलदार व प्रशासनाविरुद्ध तिरडी व जागरण गोंधळ स्वरूपाचे तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे
माधव होणराव
जळकोट तालुका अध्यक्ष
प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन संघटना महाराष्ट्र राज्य. यांनी इशारा दिला.
*तहसील प्रशासनाने सदरील निवेदनाची दखल दि. 7 ऑक्टोबर पूर्वी घेतली नाही तर प्रहार दिव्यांग संघटनेमार्फत तहसील कार्यालयासमोर प्रशासनाविरोधी जागरण व गोंधळ व तिरडी काढून आंदोलन करण्यात येईल आत्तापर्यंत तहसील कार्यालयास बरेच निवेदने देण्यात आली आहेत पण आम्ही दिव्यांग आहोत म्हणून आमच्या निवेदनाची योग्य ती दखल घेतली जात नाही यापुढे तालुक्यातील दिव्यांगांना त्यांचे हक्क मागण्या योजना आदी मागण्या संबंधित तालुक्यातील कार्यालयाकडून योग्य ती दखल घेण्यात यावी अन्यथा त्या त्या अधिकाऱ्याविरुद्ध तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल* जनार्धन घुळे यांनी सांगितले.