मुस्लिम धर्मात हज यात्रेस मोठे महत्व आहे.,जीवनात एकवेळ तरी हज करावे असे गरीब श्रीमंत सर्वांची इच्छा असते. पूर्वी ही यात्रा समुद्र मार्गे असल्याने कठीण वाटायची पण आता विमानसेवा असल्याने प्रवास महागडा असला तरी कमी वेळात सुखकर झाला आहे.
हज यात्रेसाठी आरिफ दुंगे दाम्पत्याची भावनिक रवानगी आर्णीतील सर्वधर्म समभावाचा संदेश देत दुंगे परिवारास त्यांच्या सर्व मित्र परिवार व आप्तेष्ट यांनी हज यात्रेस शुभेच्छा देऊन त्यांना रवाना केले.
हज यात्रेच्या पवित्र मार्गावर आज आर्णी शहरातील आरिफ दुंगे आणि त्यांच्या पत्नी यांना निरोप देण्यात आला. या प्रसंगी संपूर्ण दुंगे कुटुंबासह मित्र परिवार उपस्थित होता. बाबा कंबलपोश दरगाह येथे दर्शन घेऊन सर्वांनी गळाभेटींच्या माध्यमातून शुभेच्छा व आशीर्वाद दिला.
आरिफ दुंगे आणि त्यांच्या पत्नी यांच्या रवानगीच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष युनूसभाई शेख, नमो महाराष्ट्रचे तालुका प्रतिनिधी सद्दाम शेख, तसेच हाजी इरफान दुंगे यांचाही विशेष सहभाग होता. धार्मिक एकात्मतेचं प्रतीक असलेल्या या प्रसंगात आर्णीतील विविध धर्मीय मित्रांनी सामील होऊन एकतेचं दर्शन घडवलं.
या वर्षी आर्णी शहरातून एकूण ८ भाविक हज यात्रेसाठी जाणार असून, यातील फय्याज देलानी दाम्पत्य आणि फिरोज नागानी दाम्पत्य २२ मे रोजी रवाना झाले आहेत. त्यानंतर आज आरिफ दुंगे दाम्पत्याने प्रयाण केलं असून, येत्या २७ मे रोजी इम्रान दय्या दाम्पत्य देखील हज यात्रेसाठी निघणार आहे.