शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुखउद्धव ठाकरे हे विदेशात होते तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षप्रमुख राज ठाकरे हे शिवसेना उबाठा युती बाबत मराठी माणसाच्या व मुंबई च्या मुद्द्यावर सकारात्मक आहेत असे वक्तव्य केले होते. पूर्वी देखील दादू ला राज ठाकरे यांनी टाळी देण्यासाठी हात पुढे केला होता पण काही विघ्नसंतोषी लोकांनी तेव्हा तार जुळू दिले नव्हते.आताही दोन्ही पक्षातील काही महत्वाकांक्षी नेते जुळवून घ्या आधी जुने मूडदे उकरून काढत आहेत.
मात्र शिवसेना उबाठा ची झालेली पीछेहाट व मनसे ची आजची अवस्था पहाता सर्वसामान्य कार्यकर्त्यास युती व्हावी व दोन्ही ठाकरे भाऊ एकत्र यावे असे वाटते म्हणून या मताचा कौल घेऊन आता शिवसेना उबाठा सकारात्मक असल्याचे चित्र आहे
मनसे सोबत दिलसे युती होण्याची शक्यता बळावली आहे.
शिवसेनेची भूमिका सकारात्मक
संजय राऊत यांनी दोन्ही पक्षाच्या युतीबाबत मोठे भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी मुलाखत दिली आहे. किंवा राज ठाकरेंनी दुसरी मुलाखत दिली. म्हणून युतीचा विषय चर्चेला आला असेल. उद्धव ठाकरे यांनीही मुलाखतीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुलाखतीवर चर्चा ठरत नाही. एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे समोर आल्यावर गोड बोलतात. पण तसं नाही ना. मिठ्या मारतील. बाजूला बसतील. एकमेकांकडे बघून नेत्रपल्लवी करतील. पण प्रत्यक्षात तसं चित्र आहे का. तसं चित्र नाही. राज ठाकरे यांच्या तीन मुलाखतीपेक्षा प्रत्यक्षात काय चाललंय हे आम्हाला माहीत आहे. आम्ही स्वत: उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या मनसे बरोबर नातं जोडायला आम्ही सकारात्मक भूमिका ठेवली आहे. कोण काय बोलतं या पेक्षा ठाकरे काय बोलतात पडद्यामागे, मुलाखतीच्या माईकवर नाही, हे महत्त्वाचं आहे, असे संजय राऊत म्हणाले.
मनसे आणि दिलसे युती
मनसे युतीसाठी दिलसे भूमिका घेणार असल्याचे खासदार संजय राऊत म्हणाले. त्याचवेळी मनसे युतीसाठी नात्याची जोड देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे. दोघांवरही मराठी जनतेचं प्रेशर आहे. हे जसं प्रेशर भावनिक आहे, तसं राजकीय आहे. मराठी माणसाला मुंबईवर आपला अधिकार आणि हक्क कायम ठेवायचा असेल तर ईस्ट इंडिया कंपनी सुरत प्रायव्हेट लिमिटेड प्रोपरायटेड बाय अमित शाह, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस आणि वगैरे वगैरे… आणि बाकीचे शेअर होल्डरच्या जबड्यातून मुंबई वाचवायची असेल तर मराठी माणसाला सर्व काही विसरून एकत्र यावं लागेल. मराठी माणसाला ताठ मानाने या मुंबईत जगायचे असेल तर सर्व मतभेद, जळमटं आणि क्लिमिषे बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे, असे राऊत म्हणाले.
मराठी माणसाचे अहित होणार नाही
उद्धव ठाकरे यांचं मन विशाल आणि मोठं आहे. माझी कालही चर्चा झाली आहे. आपण सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही, असं आमचे पक्षप्रमुख आणि बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे यांची मनसे आणि दिलसे भूमिका आहे. मराठी माणसाचं अहित होता कामा नये. मराठी माणसाच्या मनातील योजना, इच्छा असतील तर त्या पूर्ण करण्यासाठी मागे हटता कामा नये तीच बाळासाहेबांना मानवंदना होती, असे वक्तव्य राऊतांनी केले. राज- उद्धव ठाकरे युतीची पडद्या मागची चर्चा बाहेर येईल ना. पडद्याच्या नाड्या तुमच्या हातात नाही. पडद्याच्या नाड्या कधी ओढायच्या हे दोन भाऊ ठरवतील. ठाकरे ठरवतील, असेही खा.संजय राऊत म्हणाले.