जेव्हा पासून आर्णी नगरपरिषद वर प्रशासकाचे राज्य आले तेव्हा पासून कोणाचे खेटर कोणाच्या पायात नाही
शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.मान्सून पूर्व तयारी कागदावरच पूर्ण झाली शहरातून वाहणारा एकमेव नाला दूषित पाण्याने घाणीने भरला आहे.काही दिवसांपूर्वी दूषित पाण्यामुळे साथ रोग पसरले होते शुद्ध पाण्याच्या स्वप्नात आर्णीकर रमला आहे.
पावसाळा सुरू झाला शहरातील रस्ते पाणीपुरवठा योजने च्या कामासाठी फोडून ठेवले आहेत ते कायम दुरुस्ती च्या प्रतीक्षेत आहेत.
जगतांना मरण यातना कशाला म्हणतात हे आर्णी च्या काही भागात गरल्यावर कळते नाली उपसणे नाही त्यातील मैला उचलून नेने नाही बिल मात्र अर्धे अर्धे आहे.
आर्णीत मध्यभागी एक हिंदू स्मशानभूमी आहे.तेथे शवं ठेवण्यासाठी लोखंडी कठडा आहे त्याचे लोखंडी पट्ट्या तुटल्या आहेत त्या दुरुस्त केल्या तर नफा भेटत नाही म्हणून तसेच आहे.
त्यावर शवं धड ठेवता येत नाही आर्णीत जिवंतपनी सोडा मृत देहाला देखील त्रास सहन करावा लागतो..,काय तर म्हणे प्रशासक राज…!