लेखन वाचन सांस्कृति लोप पावत चालली आहे.डिजिटल युगात हे भयंकर असल्याने वेळीच लोककला साहित्य काव्य संस्कृती टिकली पाहिजे म्हणून आर्णी येथील सुप्रसिद्ध विद्रोही साहित्यिक वऱ्हाडी बोली भाषा लेखन व संवर्धन करणारे कवी गझलकार विजय ढाले यांनी आपली तळमळ व्यक्त केली व एक पत्र काई.वसंतदादा नाईक शेती स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष हेलोंडे यांना पत्र लिहून काळजी व्यक्त केली हे लोंडेयांनीही लगेच दखल घेत अमरावती महसूल विभागाच्या। पाच जिल्ह्यातील जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देऊन साहित्य संमेलन काव्य संमेलन घेण्याचे सुचवले असे झाले तर पुन्हा एकदा लुप्त होणारी बोली भाषा जुनी परंपरा रूढी सांस्कृतिक बाबी लेखन वाचन चळवळ रुजली तर तो दिवस सुवर्णमय होईल.
महाराष्ट्र ही संताची भुमी आहे.या भुमिला साहित्य संस्कृती आणि कलेचा वारसा लाभलेला आहे. परंतू या गुगल ग्लोबल युगात आपन आपली परंपरा संस्कृती विसरत चाललोय, एके काळी प्रत्येक गाव खेड्यात विविध सांस्कृतीक कार्यक्रम व्हायचे जसे की किर्तन, डंडार, नाट्य, काव्य संमेलने,साहित्य संमेलने परंतू आता हे होतांना दिसत नाही या कारनाने अशी भिती निर्मान झाली आहे की येनारी पिढी ही संस्कृती आणि संस्कारा पासून दुर तर नाही जानार व इथे या पुढे कलाकार साहित्यीक निर्मान होनार तर नाही ना, मनोरंजना पासून समाज वंचित तर राहनार नाही.
कलेचे व कलाकारांचे संस्कृतीचे भवितव्य अंधारमय दिसत असतांना आर्णी येथील लेखक साहित्यीक कवी शेतकरी आंदोलक विजय ढाले यांनी कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन अमरावती महाराष्ट्र राज्य यांना पत्र प्रपंचा द्वारे जानिव करून दिली त्यांची ही विनंती कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष श्री. निलेश हेलोंडे यांनी तात्काळ दखल घेत अमरावती अकोला वाशिम यवतमाळ बुलडाना या सर्व जिल्हा परिषदांना समाज प्रबोधन व्हावं व गावोगावी, खेडोपाडी सामाजीक बांधीलकी म्हणून साहित्य संमेलन व्हावी,नाटके व्हावी,काव्य संमेलने सांस्कृतीक कार्यक्रम व्हावे या साठी तात्काळ कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाही बद्दल कै.वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन महा.राज्य या कार्यालयास कळवावे, असे नमुद केले आहे.