राज्यात सर्वात मोठी पक्ष फुटी झाली त्यात शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी पक्ष सोडून ४० आमदार सोबत घेऊन तत्कालीन उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वाखालील महा विकास आघाडी चे सरकार स्थापन करण्यात आलेले सरकार कोसळले.
नाट्यमयरित्या देवेंद्र फडणवीस ऐवजी कमी संख्याबळ असूनही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली व देवेंद्र फडणवीस इच्छा नसताना वरिष्ठांचे आदेशानुसार उपमुख्यमंत्री झाले.सरकार बहुमताच्या परीक्षेत पास झाल्यावर अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली व सरकार मध्ये सहभागी झाल्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे व भाजा अशी युती होती ती अजित पवारांच्या येण्याने महा युती झाली. अजित पवारांनी स्वतःला उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री केले व इतर आठ लोकांना मंत्री केले.
परंतु २०२४ च्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत महा युती ४५ पार चा नारा देत होती त्याची हवा निघाली केंद्रात देखील अबकी बार ४०० पार ची वाट लागली.यावरून राजकीय वातावरण भलतेच तापले.संघाच्या समजल्या जाणाऱ्या साप्ताहिकाचे राज्यातील पराभव हा अजित पवार यांना सोबत घेतल्या चा आरोप केला.अजित दादांना केवळ एकच जागा मिळवता आली त्यामुळे शिवसेनेचे मंत्री तानाजू सावंत व अनेक नेत्यांनी दादांना टार्गेट केले.पण अजित पवार व त्यांच्या पक्षाने प्रचंड संयम पाळला.
आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुका होत आहेत त्या पूर्वी शरद पवार यांच्या पक्षात येणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे वयाची ८३ पार करणाऱ्या शरद पवारांनी जोरदार बॅटिंग सुरू केल्यानंतर अजित पवार गटाला हळू हळू गळती लागली.अजित पवारांनी साथ सोडत अनेक दिग्गज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची तुतारी हाती घेत आहेत.
या पार्श्वभूमीवर खा.शरद पवार यांना विचारले की अजित पवार परत येतील का…?यावर भावुक झालेल्या पवारांनी सांगितले की अजित हे सत्तेसाठी सोडून गेले ते परत येतील असे वाटत नाही…असे म्हणत ते आपल्या चेहऱ्यावरचे दुःख लपून ठेऊ शकले नाही.