देशाचे पंतप्रधान नरेंदजी मोदी घराणे शाही वर नेहमीच हल्ला करतात त्यात प्रामुख्याने विरोधी पक्ष आणि त्यातल्या त्यात काँग्रेस पक्षावर तर भाजप नेते तुटून पडतात.आज भारतीय जनता पक्षाच्याया देखील घराणेशाही ने घेरले आहे.स्व. लोकनेते गोपीनाथ मुंढे राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री होते भाजप ते प्रदेशाध्यक्ष देखील होते केंद्रात ते दोन वेळा गेले निधनापिर्वी ते ते केंद्रीय ग्रामविकास मंत्री होते.त्यांच्या कन्या पंकजा मुंडे या भजप च्या मध्यप्रदेश श प्रभारी आहेत त्या माजी ग्रामविकास मंत्री होती मात्र विधानसभा निवडणुकीत भाऊ राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांच्या कडून त्याना पराभव पत्करावा लागला त्याना राज्य सभा व विधानपरिषद वर घेऊन मंत्री बनवल्या जाईल असा अंदाज असताना पक्षाने त्यांच्या धाकट्या बहीण दोन वेळच्या खासदार प्रितम मुंडे यांच्या जागी बिड ची लोकसभेची जागा दिली पण येथेही त्यांचा निसटता पराभव झाला मात्र शेवटच्या टप्प्यात पक्ष्याने त्याना विधानपरिषद वर घेतले.स्व.गोपीनाथ मुंडे यांचेसख्खे पुतणे धनंजय मुंडे महा युतीत अजित पवार गटा कडून कृषी मंत्री आहेत.आता
जय शहा अमित शहा:
अमित शहा भारतीय राजकारणातले भाजप चे किंग मेकर ते गुजरात सरकार मध्ये गृहमंत्री होते पण तेथे ते वादग्रस्त ठरले.पण २०१४ ला त्यानी मोदी व भाजा साठी तुफान प्रचार केला आणि स्वतःला सिद्ध केले .कश्मीर मधील कलम ३७० ट्रिपल टिळक या विषयांवर ते आक्रमक दिसले.त्यांचा मुलगा जय शहा राजकारणात नसला तरी तो जगातील सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेट बोर्ड चा अध्यक्ष म्हणून काम करीत आहे.
उधब ठाकरे आदित्य ठाकरे
शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणूनकं करतांना उद्धव ठाकरे २०१९ ला थेट राजकारणात आले विधानपरिषद वर आमदार होऊन राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यांचा जेष्ठ मुलगा आदित्य ठाकरे वरलीतून आमदार झाला राज्याचा पर्यावरण मंत्री झाला स्व.हिंदुहृदयसम्राट म्हणून ज्यांची ओळख होती ते शिवसेनाप्रमुख म्हणूनच शेवटपर्यंत राहील मात्र मुलगा नातू अन पुतण्या राज ठाकरे व त्यांचाही मुलगा राजकारणात सक्रिय आहेत..
रावसाहेब दानवे यांचा आमदार मुलगा संतोष दानवे[pdf_embed url=”http://bolmaharashtra.co.in/wp-content/uploads/2024/09/IMG_20240921_123659.jpg”]
राजनाथ सिंगा चा मुलगा उत्तरप्रदेश सरकार मध्ये आमदार आहे.मेनका गांधी व वरून गांधी भाजप चे खासदार होते. असे देश पातळीवर अनेक नाबे घेता येतील पण महाराष्ट्र राज्यात घराणेशाही ची मोठी परंपरा आहे राधाकृष्ण विखे पाटील राज्यात महसूलमंत्री तर मुलगा डॉ सुजय खासदार होता.विजय कुमार गावित आदिवासी विकास मंत्री तर कन्या हिना गावित दोन वेळा खासदार होत्या. काँग्रेस मध्ये बाळासाहेब विखे पाटील आमदार तर भाचा विधानपरिषद सदस्य आहे.पशमी महाराष्ट्रात तर डझन भर घराणे शाही पहायला मिळते. मराठवाडा विभागात रावसाहेब दानवे खासदार केंद्रीय राज्यमंत्री तर मुलगा आमदार आहे कुणाचा मुलगा नगराध्यक्ष तर कुणाचा जिल्हा परिषद सदस्य तर कोणी पंचायत समितीला सभापती अशोकराव चव्हाण यांचे वडील मुख्यमंत्री तर अशोकराव मुख्यमंत्री होते त्यानी आता भाजप मध्ये आदर्श प्रवेश केला.आता त्यांच्या पत्नी माजी खासदार किंवा मुलगी श्रीजया विधानसभा लढण्याची श्यक्यता आहे.
या कडीत यवतमाळ जिल्ह्यातील राजकारणाचा विचार केला तर स्व.वसंतराव नाईक साहेबांचे नाव अग्र क्रमाने घ्यावे लागते.हरित क्रांतीचे प्रणेते म्हणून त्यांची आजही ओळख आहे.त्यांचे पुतणे स्व.सुधाकर नाईक हे देखिल मुख्यमंत्री होते.त्यांचे पुतणे ad निलंय नसिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आता ते भाजप कडून विधानपरिषद सदस्य होते.तेहू पुसद मधून आमदारकी ची तयारी करत आहेत.मनोहर भाऊ नाईक हे किंग मेकर म्हणून प्रसिद्ध आहे राज्याच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा आहे बंजारा समाजाचे ते नेते असून त्यांचा मोठा मुलगा ययाती नाईक जिल्हापरिषद उपाध्यक्ष होता पण मागील निवडणुकीत जिल्हा परिषद गणात पराभव झाल्याने इंद्रनील नाईक या लहान पुत्रास मनोहर भाऊंनी संधी दिली. ते विजयी होऊन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात गेल्याने आता मनोहर भाऊंच्या दोन वारसदार पुत्रात आगामी विधानसभा निवडणूक होईल असे चित्र आहे.
दुसरे सर्वात मोठे नाव मणजे काँग्रेस या जिल्ह्यात नाईक साहेबां नंतर जर कोणी रुजवली असेल तर ती स्व.देवराव भाऊसाहेब पातळ यांनी रुजवली ते दोन वेळा विधानसभा सदस्य एक वेळा विधानपरिषद सदस्य. तर एक वेळा यवतमाळ चे खासदार देखील राहिले.स्व.पुंडलीकराव गवळी वाशिम मधून शिवसेनेचे खासदार होते त्याच्या निधनानंतर त्यांची कन्या भावना ताई गवळी ह्या सलग चारवेळा खासदार राहिल्या पण पक्षाने २०२४ ला त्याना उमेदवारी दिली नाही आता त्याना विधानपरिषद वर आमदार म्हणून एकनाथ शिंदे यांनी घेतले
[pdf_embed url=”http://bolmaharashtra.co.in/wp-content/uploads/2024/09/730-x-548-2024-03-25t121013267_1711348819.jpg
जिल्ह्यातील मोठे नाव म्हणून शिवाजीराव मोघे याचे आहे काँग्रेस चे जेष्ठ निष्ठावंत म्हणूनही दिल्लीत त्यांची वेगळी ओळख आहे त्याना काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय आदिवासी काँग्रेस चे अध्यक्ष पद दिले.एक मनमिळाऊ कार्यकर्तना जपणारा त्यांच्या सुख दुःखात मदतीला धावणाऱ्या नेत्या पैकी व कार्यकर्त्याला नेहमी मोठे करणारे नेतृत्व म्हणजे शिवाजीराव मोघे.बेईमान कार्यकर्त्याला ते विसरले नाही तर मदत करणाऱ्याला लाख परिस्थिती असली तरी सोडले नाही असा त्यांचा स्वभाव यामुळे त्यानी आर्णी केळापूर मतदारसंघात नेतृत्व करून अनेकदा महत्वाच्या खात्याचे मंत्रिपद देखील सांभाळले राजकारणाचे बाळकडू व संस्काराची शोदोरी घेऊन त्यांचे पुत्र आर्णी विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाले असून लोकसभेत त्यानी काँग्रेस उमेदवारा साठी प्रचंडमेहनत घेतली पांढरकवडा घटसनजी आर्णी तालुका पिजून काढला लोकांचे प्रश्नविचारीन अनेक आंदोलन केले मोर्चे काढले विवीध प्रश्नावर निवेदन दिले.आता शिवाजीराव मोघे यांनी आगामी निवडणुकी मधून माघार घेतल्यास जितेंद्र मोघे यांच्या सासाठीउमेदवारी मिळवणे एव्हढेच बाकी असून तरुणांचा जितेंद्र मोघे यांना वाढता पाठिंबा पहाता ही निवडणूक त्याना सहज श्यक्य होईल असे चित्र आहे गट लोकसभा निवडणुकीत काँग्रेस च्या एका गटाने काँग्रेस चा हात सोडला होता तरीही आता विधानसभा निवडणुकीत मोघे साहेबांच्या प्रेमापोटी काही पुन्हा वापसी करतील असे बोलले जाते.