संदिप ढाकुलकर :शिक्रापूर
दी.२०/९/२४
“शिक्रापूर (कळमकर वस्ती )येथे मोफत आरोग्य शिबीराचे उद्घाटन संपन्न,,
शिक्रापूर (पुणे) कळमकर वस्ती येथे केईएम हॉस्पिटल संशोधन केंद्र वढू ग्रामीण यांच्या सहकार्याने अत्याधुनिक मशीन द्वारे ग्राम पंचायत सदस्य त्रिनयन कळमकर यांच्या पुढाकाराने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले.या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी शिक्रापूर चे सरपंच रमेश गडदे, समता परिषद पच्छिम महाराष्ट्र अध्यक्ष सोमनाथ भुजबळ,मा.उपसरपंच सुभाष खैरे,ग्रा.प.सदस्य विशाल खरपुडे,नवनाथ सासवडे,मा.सरपंच जयश्री ताई भुजबळ, भाजपा चे नेते राजाभाऊ मांढरे,ग्रा.प.सदस्या उषा राऊत, मधुकर कळमकर,रंगनाथ दरडे,राहुल सासवडे,लक्ष्मण दादा भुजबळ, विनायक गायकवाड,पंडित डोंगरे,गोरक्ष भोसकर,युवराज कळमकर,प्रशांत कळमकर,अशोक कळमकर, योगेश कळमकर,शंकर सोनवणे,दशरथ कळमकर,अमित कळमकर,भरत कळमकर,मंदा कळमकर,संतोषी कळमकर,सीमा कळमकर,सविता शिन्नलकर ,पत्रकार निलेश जगताप आणि केईएम हॉस्पिटल रिसर्च सेंटर तर्फे मुख्य व्यवस्थापक डॉ.आनंद कवडे,डॉ.उद्धवी कांद आरोग्य अधिकारी ,डॉ.निलेश खोमने,कर्मचारी वैभव राऊत,प्रशांत गायकवाड,योगेश पवार आणि आरोग्य सेविका शिवले ताई उपस्तिथ होते.
सदर शिबिर हे दि.२० सप्टेंबर २०२४ ते ४ऑक्टोंबर २०२४ पर्यंत १० ते ३ या वेळेत राहील असे आयोजक कर्तव्यदक्ष ग्रा.प.सदस्य त्रिनयन कळमकर यांनी सांगितले.तरी सर्व गरजूनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे