देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथे विश्वकर्मा योजनेच्या कार्यक्रमास आले असताना अमरावतीच्या बहुप्रतिक्षित टेक्सटाईल पार्क चे दूर दृश्य पद्धतीने उद्घाटन केले.
या पूर्वी देशभरात २३ ठिकाणी टेक्सटाईल पार्क निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी यांनी शब दिला होता.त्यानुसार मराठवाड्यात छत्रपती संभाजी नगर व विदर्भातील अमरावती येथे हे पार्क प्रस्तावित होते.अमरावतीच्या टेक्सटाईल पार्क बद्दलशंका निर्माण झाला होता.पण तत्कालीन खासदार नवनीत राणा यांनी प्रयत्न करत अमरावती मधेच व्हावा असा आग्रह सरकार कडे केला होता. मात्र दोन महिन्यांपूर्वी नवनीत राणा याचा प्रभाव झाला होता वर्धा येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवनीत राणा यांना श्रेय दुल्याने राणा भावुक झाल्या होत्या
हा टेक्सटाईल पार्क पूर्ण झाला तर विदर्भातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होऊल १००० एकरा वर उभारण्यात येणाऱ्या या पार्क साठी १० हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून यामध्ये १००००० युवकांना रोजगार मिळणार असल्याची माहिती आहे.