अमरावती महानगरपालिका च्या उपायुक्त माधुरी तशी मडावी यांनी अखेर काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. यवतमाळ,दिग्रस,आर्णी,महागाव आदी ठिकाणी बेधडक शिस्त प्रिय कामकाज करणाऱ्या अमरावती महानगरपालिका च्या सहायक उपायुक्त असलेल्या माधुरी ताई मडावी ह्या प्रशासनात काम करताना राजकीय दबावाखाली काम करत नव्हत्या त्यामुळे त्यांच्या सतत बदल्या होत होत्या.म्हणून अखेर प्रशासकीय व्यवस्थेला कंटाळत राजकिय व्यवस्थेत काम करण्यासाठी त्यानी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याचे मानल्या जात आहे. अखिल भारतीय महिला काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी माधुरी ताई मडावीयांना राज्य सचिव महिला काँग्रेस ह्या पदावर नियुक्ती दिली असून मडावी ह्या गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी विधानसभा निवडणूक लढण्यासाठी श्यक्यता आहे.
कालच मुंबईत पांडे नामक सेवानिवृत्त पीस महासंचालक यांनी कॉंग्रे मध्ये प्रवेश घेतला आहे.मडावी यांनी काँग्रेस मध्ये प्रवेश घेतल्याने कॉंग्रेसला आदिवासी व महिला मंडळाच्या मतांचा फायदा होईल असे बोलले जात आहे.