7k Network

सरकारला दंगली घडवायच्या आहेत:मनोज पाटील जरांगे

मराठा समाजाला ओबीसितून आरक्षण द्यावेमराठा समाजाच्या आंदोलकां विरुद्धचे गुन्हे रद्द करावे,हैद्राबाद गॅझेट लागू करून सरसगट मराठा समाजाला आरक्षण देऊन सगे सोयरे संदही कायदा करीन अंमलबजावणी करावी ह्या प्रमुख मागण्या गेली वर्षभर मनोज पाटील अंतरवली सराटीत   आमरण उपोषण सुरू केले पहिल्या वेळी शांततेत आंदोलन करण्यात येत असताना पोलिसांनी अबाल वृद्धा वर अमानुष हल्ला केला आणि मनोज पाटील यांचे आंदोलन राज्यभर पसरले.

मनोज पाटलांच्या जाहीर सभेला १० लाखा पासून कोटी संख्येने मराठा समाज उपस्थित होत होता.अनेकवेळा पाटील यांनी सरकारला इशारा दिला पण ओबीसी नाराज होऊ नये म्हणून चोपडी भूमिका सरकारने घेत वेळ काढू धोरण स्वीकारले. मुंबईत कूच केलेल्या आंदोलक व मनोज पाटलांना अध्यादेश सूचना देत समाधान करून परत पाठवले पण सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली असे वाटल्याने मनोज पाटलांनी उपोषणाचा लढा सुरूच ठेवला. ही आता त्यांची सहावी वेळ आहे उपोषणाची पण यावेळी सरकार व पोलीस  प्रशासनाने वडीगोद्री कडून अंतरवली सराटी जाणारा रस्ता रोखला त्यामुळे मनोज पाटील आक्रमक झाले.त्या ठिकाणी ओबीसी व मराठा आंदोलक आमने सामने आले व दोन्ही कडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते

दोन्ही कडून आंदोलकाना समजूत काढण्यात पोलिसांना मोठी कसरत करावी लागली.ओबीसी आरक्षण बचाव म्हणून प्राध्यापक लक्षण हाके हे देखील अंतरवली सराटी येथे उपोषणास बसणार आहेत मात्र यामुळे मनोज पाटील हे संतप्त झाले सरकारला दंगली घडबायच्या आहेत असा आरोप केला माहीत असतांना लक्ष्मन हाके च्या उपोषणास परवानगी कशी दिली असा सवाल देखील त्यानी उपस्थित केला तर वडीगोद्री मार्गे अंतरवली सराटी ला जाणारा रस्ता  पोलिसांनी बंद केला हा रस्ता लवलर खुला करा नाही तर तुमचे बॅरीकेट काढा अन्यथा ते सागर बंगल्यावर उचलून फेक असे पाटील म्हणाले.

Share this post:

खबरें और भी हैं...

लाइव टीवी

लाइव क्रिकट स्कोर

कोरोना अपडेट

Weather Data Source: Wetter Indien 7 tage

Quick Link

error: Content is protected !!