घरची परिस्थिती हलाखीची पण पेंटिंग ची आवड असणाऱ्या आर्णी येथील सुभाष मोहाडे यांनी काही दिवस शहरातील नांवे पेंटर जावेद यांच्याकडे धडे गिरवले पण डिजिटल युगात बोर्ड पेंटिंग जवळपास बंद झाल्याने सुभाष पेंटर म्हणून परिचित असलेल्या कलावंतानेग चिखलात हॅट घातले अन हळू हळू मूर्ती आकार घेऊ लागल्या कलेची व रंगसंगती ची जाण असलेल्या सुभाष मोहाडे च्या मुर्त्या प्रसिद्ध झाल्या.ते आपल्या अंकुश या मंडळाचा मोठा गणपती मोफत बनवतात.
गणपती दुर्गादेवी च्या मातीच्या मूर्ती बनविताना हा कलाकार मातीत जीव ओततो अतिशय नम्र स्वभावाचे असल्याने सुभाष पेंटर चे सर्व मंडळ चाहते आहेत.पेंटिंग पोर्टेट वाल पेंटिंग,सोबत मातीच्या मूर्ती,फायबर व सिमेंट च्या मूर्त्याही हुबेहूब आणि पुतळा देखील सुभाष पेंटर हुबेहूब बनवतात
मंदिराचे नक्षीदार घुमत पिलर कमानही सुभाष पेंटर बनवतात.आपल्या स्वभावाने सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनलेला हा कलावंत आर्णी शहराचे भूषण आहे.